ब्रिसेल्स : रशियानं युक्रेनवर (Russia Ukraine War) हल्ला चढवल्यानंतर आता The North Atlantic Treaty Organization (NATO) अर्थात नाटोनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. रशियाला प्रतिकार करण्यासाठी युक्रेनच्या सीमेवर लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या सैनिकांची कुमक वाढवण्यास नाटोनं मंजुरी दिली आहे. (NATO agrees to beef up land sea and air forces near Ukraine after Russian attack)
आपत्कालिन बैठकीनंतर नाटोच्या राजदुतांनी आपल्या निवदेनात म्हटलं की, "सर्व प्रकारच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी आम्ही आमच्या सैन्य दलांना मोठ्या प्रमाणावर तयारीत राहण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी नाटोचे सदस्य असलेल्या ३० सदस्य देशांनी शस्त्र, दारुगोळा आणि इतर उपकरणांचा युक्रेनला पुरवठा सुरु केला आहे" एक संस्था या नात्यानं नाटो युक्रेनच्या मदतीसाठी कोणतीही लष्करी कारवाई करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
“सर्व मित्रपक्षांचे संरक्षण करण्यासाठी आमच्या संरक्षणात्मक नियोजनानुसार, प्रतिकार आणि संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी अतिरिक्त पावलं उचलण्याचं आम्ही ठरवलं आहे,” असं राजदूतांनी एका निवेदनात म्हटलं आहे. आमची पावलं ही प्रतिबंधात्मक असतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.