ग्लोबल

Eighth Wonder Of World: जगातील आठवं आश्चर्य ठरलं कंबोडियामधील हिंदू मंदिर! मंदिराची ही वैशिष्ट तुम्हाला माहितीये?

जगातील आठवे आश्चर्य अशी मान्यता लाभलेले अंगकोर वाट आहे तरी काय?

Aishwarya Musale

कंबोडियामध्ये असणाऱ्या अंगकोर वाट मंदिराला आता जगातील आठवं आश्चर्य म्हटलं जात आहे. याबाबत अनौपचारिक घोषणा करण्यात आली आहे. कंबोडियाच्या मध्यभागी असलेले अंगकोर वाट हे इटलीतील पॉम्पेईला मागे टाकत जगातील आठवे आश्चर्य बनले आहे.

जगाचे आठवे आश्चर्य नवीन इमारती, प्रकल्प आणि डिझाइन यांना दिलेले अनौपचारिक शीर्षक आहे. अंगकोर वाट १२व्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय याने बांधली होती. अंगकोर वाट हे मूळ हिंदू देव विष्णूला समर्पित होते, परंतु कालांतराने त्याचे बौद्ध मंदिरात रूपांतर झाले. आता या ठिकाणाहून इटलीच्या पोम्पेईला हटवून हे स्थान अंगकोर वाटला देण्यात आले आहे.

अंगकोर वाट हे जगप्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. मूलतः हे मंदिर भगवान विष्णूंचे असून इसवी सनाच्या १२ व्या शतकात उत्तर कंबोडियामध्ये सूर्यवर्मन दुसरा या राजाच्या कालखंडात बांधण्यात आले होते.

कंबोडियाचे अंगकोर वाट

कंबोडियातील अंगकोर वाट हे जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक आहे. हे एक विशाल मंदिर संकुल आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. UNESCO ने यापूर्वीच Angkor Wat मंदिराला वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केलं आहे.

फ्रेंच प्रवासी हेन्री मौहॉट यांनी १८४० साली केलेल्या नोंदी मुळे पुन्हा एकदा जगाचे लक्ष या मंदिराकडे वळले. वालुकाष्म दगडाचा वापर या मंदिराच्या बांधकामात करण्यात आलेला आहे. या मंदिराच्या सभोवती विस्तीर्ण खंदक असून १५ फूट उंच प्राकार भिंत आहे. या प्राकाराच्या आत, अंगकोर वाट मंदिर ४०० एकरांपेक्षा जास्त परिसरात पसरलेले आहे. या मंदिराची कला शैली अंगकोर वाट शैली म्हणून ओळखली जाते.

अंगकोर वाटचा इतिहास

बाराव्या शतकात राजा सूर्यवर्मन द्वितीय यांनी या मंदिराची निर्मिती केली आहे. अंगकोर वाट हे सुरुवातीला विष्णु मंदिर होतं. कालांतराने याचं रुपांतर बौद्ध मंदिरात झालं. त्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामांमध्ये हिंदू आणि बौद्ध पौराणिक कथांचे वर्णन स्पष्टपणे दिसते.

सूर्यवर्मन यांनी व्हिएतनामपर्यंत आपले राज्य वाढविले होते. सूर्यवर्मन हो विष्णूचो परम भक्त होतो. यांच्या काळात अनेक विष्णू मंदिरे बांधली गेली. त्या सर्वांमध्ये अंगकोर वाट हे भव्य तसेच कला व स्थापत्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते.

हे मंदिर सुमारे 500 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे. याच्या बाजूला असणाऱ्या भिंतींच्या चारही बाजूंनी खोल दरी आहे. या मंदिरात कमळाच्या आकाराचे पाच टॉवर देखील आहेत. खरं तर, त्याची सुंदर वास्तुकला हे जगातील आठवे आश्चर्य बनवते.

अंगकोर वाट मंदिर एक प्रसिद्ध सनसाईज पॉइंट देखील आहे. सूर्योदयाच्या वेळी मंदिर गुलाबी, नारंगी आणि सोनेरी रंगांमध्ये न्हाऊन निघतं.

सांस्कृतिक महत्त्व

हिंदू आणि बौद्ध संस्कृतींचं मिश्रण असलेल्या या मंदिराला मोठं सांस्कृतिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. दोन्ही धर्मांचे लाखो भाविक या मंदिराला भेट देतात.

सिएम रीप आंतरराष्ट्रीय विमानतळ (REP) हे आता अंगकोर वाटचे सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळ कॉम्प्लेक्सच्या पूर्वेस सुमारे 40 किलोमीटर अंतरावर आहे.

काय घालायचे

फुल स्लिव्हसचे कपडे घाला आणि गुडघ्याखाली येणारी पॅन्ट किंवा स्कर्ट घाला.

काय करू नये

मंदिरातील दगडांना स्पर्श करू नका, त्यावर चढू नका, तोडफोड करू नका.

कधी जायचे

अंगकोर वाट पहाटे ५ ते संध्याकाळी ६ या वेळेत वर्षभर उघडे असते. आत जाण्यासाठी तिकीट खरेदी करणे आवश्यक आहे. कोरडा हंगाम, जो नोव्हेंबर ते मार्च पर्यंत असतो, भेट देण्यासाठी सर्वात लोकप्रिय वेळ आहे कारण दिवस थंड असतात. पावसाळ्यानंतर जावे, जेव्हा तलाव भरलेले असतात आणि मंदिरांभोवती हिरवीगार हिरवळ असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT