Nepal Census Report Released esakal
ग्लोबल

Nepal Census Report : नेपाळ घाबरला? भारताच्या 'या' भूभागावरचा दावा घेतला मागं

नेपाळनं जनगणनेचा अंतिम अहवाल नुकताच जाहीर (Nepal Census Report Released) केलाय.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : नेपाळनं जनगणनेचा अंतिम अहवाल नुकताच जाहीर (Nepal Census Report Released) केलाय. विशेष म्हणजे, यात पिथौरागढ जिल्ह्यातील कालापानी (Pithoragarh Kalapani) क्षेत्राचा डेटा समाविष्ट केलेला नाही.

नेपाळचं हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे. कारण, जानेवारी 2022 मध्ये जाहीर झालेल्या प्राथमिक जनगणनेच्या अहवालात त्याचा समावेश करण्यात आला होता.

कालापानीतील 3 गावांचा डेटा गायब

हा डेटा गंजी, नबी आणि कुटी गावांशी संबंधित आहे, जे भारताच्या बाजूला येतात. त्यावर नेपाळ आपला दावा करत आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अंतिम अहवालात कालापानीतील 3 गावांचा डेटा गायब आहे.

नेपाळचा अहवाल भारतीय जनगणनेवर आधारित

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, नेपाळचा प्रारंभिक अहवाल 2011 च्या भारतीय जनगणनेवर आधारित होता. नेपाळचे अधिकारी भारतीय हद्दीत असलेल्या या गावांना भेट देऊ शकत नसल्यामुळं प्रत्यक्ष आकडेवारी गोळा करता येत नाही.

'भारतीय अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही'

नेपाळमधील माध्यमांनी अधिकारी नबिन श्रेष्ठ यांचा हवाला देत म्हटलंय, "भारतीय अधिकाऱ्यांनी सहकार्य न केल्यामुळं आम्ही या भागात जाऊ शकलो नाही. परंतु, या भागात राहणाऱ्या लोकांची एकूण संख्या 500 पेक्षा कमी असल्याचा आमचा अंदाज आहे. पडताळणी करणं अवघड आहे. म्हणूनच, आम्ही अंतिम अहवालात या भागाची लोकसंख्या समाविष्ट केली नाही."

नेपाळच्या जनगणनेचा भारताशी काय संबंध?

कुटीचे रहिवासी कुंवर सिंग यांनी सांगितलं की, गंजी, नबी आणि कुटी ही भारतातील गावं आहेत आणि पुढंही राहतील. नेपाळच्या जनगणनेचा याच्याशी काय संबंध? असा सवाल त्यांनी केला. मे 2020 मध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लिपुलेख रस्त्याचं उद्घाटन केलं, तेव्हा हा मुद्दा ठळकपणे समोर आला. लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी हे आपलं क्षेत्र असल्याचा दावा नेपाळनं केला होता. नेपाळच्या संसदेनं राजकीय नकाशात सुधारणा करण्याचा ठरावही मंजूर केला होता आणि तो आपला प्रदेश म्हणून दाखवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाराष्ट्राच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल आला हाती...

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज्यात मतमोजणीला सुरवात

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT