nepal plane crash co pilot anju khativada also lost her husband in plane crash promoted as captain after landing  
ग्लोबल

Nepal Plane Crash : १६ वर्षांपूर्वी विमान अपघातात पती गमावला, आज तीही…; लँडिंगनंतर मिळणार होतं प्रमोशन

सकाळ डिजिटल टीम

नेपाळमधील पोखरा येथे विमानतळावर उतरताना रविवारी (१५ जानेवारी) पाच भारतीयांसह ७२ जणांना घेऊन जाणारे नेपाळी प्रवासी विमान कोसळले.या अपघातात आतापर्यंत ६८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

या भीषण अपघातानंतर जून काही मृतदेह बाहेर काढायचे आहेत.तसेच शोध मोहीम आजसाठी थांबवण्यात आली आहे अशी माहिती नेपाळ लष्कराच्या अधिकाऱ्यानी दिली आहे. या दरम्यान, या अपघातात कोसळलेल्या विमानाची को-पायलट अंजू खतिवडा ( Anju Khativada) यांच्याबद्दल ऐकून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत.

विमानाच्या सहवैमानिक (Co-Pilot) अंजू खतिवडा यांचे को-पायलट म्हणून हे शेवटचे उड्डाण होते. आज सुरक्षित लँडिंग करून त्या कॅप्टन बनणार होत्या. कॅप्टन होण्यासाठी त्यांनी सीनियर पायलट आणि इन्स्ट्रक्टर कमल केसी यांच्यासोबत फ्लाइटमध्ये गेल्या. पायलट होण्यासाठी किमान 100 आवर्स(तास) उड्डाणाचा अनुभव आवश्यक आहे. को-पायलट अंजू यांनी याआधीही नेपाळच्या जवळपास सर्व विमानतळांवर यशस्वीपणे उतरवले होते.

यशस्वी लँडिंगनंतर मिळणार होतं कँप्टन पद

पोखराकडे उड्डाण करताना कॅप्टन केसी यांनी त्यांना मुख्य वैमानिकाच्या सीटवर बसवले होते. आज, यशस्वी लँडिंगनंतर, अंजू यांना मुख्य वैमानिकाचा परवाना मिळणार होता, परंतु दुर्दैवाने, फक्त १० सेकंदांच्या अंतरावर, तिची स्वप्ने आणि आकांक्षा धुळीत मिळाल्या आहेत.

यती एअरलाइन्सच्या विमानाच्या को-पायलट कॅप्टन होण्यापूर्वी १० सेकंद आधी त्यांना मृत्यू आला. कॅप्टन केसी यांना पायलट म्हणून ३५ वर्षांचा अनुभव होता. केसी यांनी याआधी अनेक वैमानिकांना प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांचे प्रशिक्षित लोक आज यशस्वी वैमानिक म्हणून ओळखले जातात.

पतीचाही विमान अपघातातच मृत्यू

या दुःखद घटनेचा आणखी एक योगायोग असा की को-पायलट अंजू यांचे पती दीपक पोखरेल यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला आणि तेही यती एअरलाइन्समध्ये होते. १६ वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचा को-पायलट म्हणून मृत्यू झाला होता.

२१ जून २००६ रोजी अपघात झालेल्या यती एअरलाइन्सच्या विमानाचा को-पायलट दीपक हे होते. नेपाळगंजहून सुर्खेतमार्गे जुम्ला येथ जाणारे यति एअरलाइन्सचे 9N AEQ विमान कोसळले होते ज्यात ६ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT