Make Porn Boring eSakal
ग्लोबल

Make Porn Boring : 'पॉर्नला बॅन नका करू, लैंगिक अभिव्यक्तीचा अभिमान बाळगा'; पॉर्नहबच्या मालकाचे सरकारला आवाहन

कॅनडामधील इथिकल कॅपिटल पार्टनर्स (ECP) या कंपनीने ही खरेदी केली आहे.

Sudesh

कॅनडाच्या एका खासगी इक्विटी फर्मने पॉर्नहब या वेबसाईटच्या पॅरंट कंपनीला खरेदी केले आहे. त्यामुळे पॉर्नहब, यू पॉर्न अशा कित्येक वेबसाईट्स आता या फर्मच्या मालकीच्या झाल्या आहेत. यानंतर पॉर्नहबच्या नवीन मालकाने सर्व देशांना असं आवाहन केलं आहे, की पॉर्न वेबसाईटवरील कारवाई बंद करावी. (Pornhub new owner)

कॅनडामधील इथिकल कॅपिटल पार्टनर्स (ECP) या कंपनीने ही खरेदी केली आहे. ही खरेदी सध्या कायदेशीर वादातही अडकली आहे. ही वेबसाईट वापरणाऱ्या यूजर्सचं वय तपासून घेण्याच्या आदेश अमेरिकेत पारित करण्यात आला होता. अशाच प्रकारचा नियम फ्रान्समध्येही लागू करण्यात आला होता. मात्र, माईंडगीकच्या दोन्ही वेबबसाईटवर अशा प्रकारचे सर्टिफिकेशन लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर प्रतिबंध लागू शकतो.

ईसीपीच्या मालकाचे आवाहन

ईसीपीचे संस्थापक सोलोमन फ्राईडमॅन यांनी एएफपीला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये याबाबत भाष्य केलं. ते म्हणाले, की आमच्या वेबसाईटवर आम्हाला अल्पवयीन यूजर्स नको आहेत. मात्र याची जबाबदारी केवळ वेबसाईट कंपन्यांवर टाकणं चुकीचं आहे. त्याऐवजी ऑपरेटिंग सिस्टीमनेच यावर उपाय शोधायला हवा, जेणेकरून अल्पवयीन यूजर्स अशा वेबसाईटपर्यंत पोहोचणार नाहीत.

गुगल आणि अ‍ॅपल आपल्या ब्राऊजरवर अशी सेटिंग आरामात करू शकतात. त्यामुळे ब्राऊजर-आधारित एज व्हेरिफिकेशन लागू करण्यात यावं या मागणीवर त्यांनी जोर दिला.

लैंगिक अभिव्यक्तीचा अभिमान बाळगा

सोलोमन म्हणाले, की सरकारने पॉर्न वेबसाईटवर कारवाई करणं बंद करायला हवं. त्याऐवजी लैंगिक अभिव्यक्तीचा अभिमान बाळगायला हवा. पॉर्न हे अगदी सामान्य आणि रटाळ बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. कॅनडामध्ये ठराविक अमली पदार्थ कायदेशीर केल्यानंतर ज्याप्रमाणे सर्वांना ते कंटाळवाणे वाटू लागले, त्याचप्रमाणे पॉर्न हे केवळ प्रौढांसाठी आहे हे देखील कंटाळवाणे होणार आहे; असं ते म्हणाले. (Make Porn Boring)

माईंडगीकचा वाद

यापूर्वी २०२० साली पॉर्नहबची तेव्हाची मालक असलेली कंपनी माईंडगीक मोठ्या वादात सापडली होती. न्यूयॉर्क टाईम्सने प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की या वेबसाईट्सवर अल्पवयीन मुलांशी संबंधित बलात्कार आणि लैंगिक संबंधांचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. यामुळे कित्येक देशांनी पॉर्न साईट्सबद्दलचे आपले नियम अधिक कडक केले होते

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif : 'तुम्ही मला आशीर्वाद दिला नसता, तर मी आमदार-मंत्री झालोच नसतो'; असं का म्हणाले मुश्रीफ?

"त्याने त्याच्या मुलाला एक फोन केलेला नाही" ; 'इस प्यार को..'फेम अभिनेत्रीचा एक्स नवऱ्यावर आरोप, म्हणाली...

Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Donald Trump Vs Kamala Harris: अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक अटीतटीची

कलर्सच्या नव्या मालिकेचं प्रसारण रखडलं; प्रेक्षकांनी रोष व्यक्त करताच वाहिनीने मागितली माफी, पोस्ट करत लिहिलं-

SCROLL FOR NEXT