Covid Sakal
ग्लोबल

Covid-19 outbreak : कोविडचा नवा व्हेरियंट भारताला कितपत हानीकारक?

चीनमध्ये कोरोना प्रचंड वाढल्याने भारतातही त्याविषयी काळजी घेतली जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

चीनमध्ये पुन्हा करोनाचे थैमान सुरू झाले आहे. Omicron उप-प्रकार BF.7 ची किमान चार प्रकरणे भारतातही आढळली आहेत. परंतु आपल्याला घाबरण्याची गरज नाही, असे भारतीय सरकारचे म्हणणे आहे. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी राज्यांना नमुने पाठवण्यास सांगितले आहे. त्यामुळे कोविडचे प्रकार ओळखण्यास मदत होईल.

आतापर्यंत, गुजरातमधून दोन, ओडिशातून दोन प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

या प्रकरणांत BF.7 व्हेरियंट आढळून आला आहे. यूएस आणि यूके आणि बेल्जियम, जर्मनी, फ्रान्स आणि डेन्मार्क सारख्या युरोपियन राष्ट्रांसह इतर अनेक देशांमध्ये हे आधीच आढळले आहे.

सरकारने लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.

भारतीयांनी घाबरण्याची गोंधळण्याची गरज नाही, कारण आपल्याकडे प्रौढांचे लसीकरण झाले आहे, असे लस निर्माता सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) च्या आदर पूनावाला यांनी म्हटले आहे.

बुधवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, "कोविड अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सावध राहण्याचे राहण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही संकटाशी दोन हात करण्यास आम्ही सज्ज आहोत."

केंद्र सरकारने राज्यांना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत नमुने पाठवण्यास सांगितले आहे, जे व्हेरियंट किंवा सब व्हेरियंट ओळखण्यात मदत करू शकतात.

"जपान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया प्रजासत्ताक, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली प्रकरणे पाहता, या व्हेरियंटचा मागोवा घेण्यासाठी पॉझिटिव्ह केस नमुन्यांची संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग तयार करणे गरजेचे आहे," असे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना कळवलं आहे.

BF.7 या नव्या व्हेरियंटची भीती का आहे ?

या व्हेरियंटमुळे सध्या चीनमध्ये हाहाकार उडवला आहे, असं सांगितलं जातं. कारण या व्हेरियंटमध्ये संसर्गाची क्षमता जास्त आहे. याआधी संक्रमित किंवा लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही याची बाधा पुन्हा होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.

covid

कोरोनाची प्रमुख लक्षणे

खोकला - अगदी न थांबणारा खोकला, २४ तासांत किंवा एका दिवसात खोकल्याची उबळ तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा येण्याची शक्यता असते.

ताप - शरीराचं तापमान 100.4F पेक्षा अधिक असेल तर

तोंडाची चव जाणे, वास कमी येणं - तोंडाची चव जाते, कसलीच चव लागत नाही. काहीवेळा वास येतच नाही. चव आणि वास दोन्ही गेले तरी त्याला करोनाची लक्षणे असंच म्हणतात.

लक्षणं बदलू शकतात का?

नक्कीच.

करोना व्हायरसचा शरीरातल्या विविध अवयवांवर वेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याची वेगळी लक्षणं असू शकतात.लक्षणं बदलू शकतात का?

नक्कीच.

करोना व्हायरसचा शरीरातल्या विविध अवयवांवर वेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याची वेगळी लक्षणं असू शकतात.

भारताला घाबरायचं कारण नाही. रुग्ण वाढ नाही, केसेस वाढल्या आहेत. ओमीक्रॉन असला तरी तो बरा होतो. चीनमध्ये कोणत्याही नैसर्गिक संसर्गाची सवयच नव्हती. त्यामुळे त्यांना हे सगळं फार जड जात आहे. तेव्हा कुणी घाबरून जाऊ नये. नवीन व्हेरियंट येऊ शकतात. मात्र त्यासाठी टाळेबंदी लागू करण्याची गरज नाही. - डॉ रवी गोडसे

कोविडचे सध्या संशोधकांनी ६ उप प्रकार ठरवले आहेत.

त्याची अर्थातच निरनिराळी लक्षणं असतात.

  • तापाची लक्षणं आहेत, पण ताप नाही. - रुग्णाचे डोके दुखणे, वास न येणं, स्नायू दुखणे, खोकला, घसा खवखवणं, छातीत दुखायला लागणे, मात्र ताप नाही.

  • तापाची लक्षणंही आहेत आणि तापही आहे. - डोकेदुखी होते. तसेच वास येत नाही घसा खवखवतो, खोकला होतो. भूक लागत नाही.

  • आतडी आणि पचनसंस्थेवर हल्ला : डोकेदुखी, वास न येणं, भूक न लागणं या लक्षणांबरोबर रुग्णाला अतिसार, घसा खवखवतो, छातीत दुखतं मात्र खोकला येत

  • काहीवेळा रुग्णाला प्रचंड थकवा येतो. त्यावेळी डोके दुखणे, वास न येणे, खोकला, ताप, घसादुखी अशी बाकीची लक्षणंही असतात. मात्र या सगळ्या लक्षणांबरोबर स्नायू दुखत असतील, गोंधळून जायला होत असेल तर मात्र जास्त काळजी घेणं आवश्यक आहे.

  • त्याहीपेक्षा काळजीचे कारण म्हणजे वरील सगळ्या लक्षणांबरोबर धाप लागणं, पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. लहान मुलांमध्ये असलेली अशी लक्षणे, अजिबात दुर्लक्षित करू नयेत. ती कोरोनाची असू शकतात, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

डॉक्टर काय म्हणतात?

डॉ रवी गोडसे म्हणाले, भारताला घाबरायचं कारण नाही. रुग्ण वाढ नाही, केसेस वाढल्या आहेत. ओमीक्रॉन असला तरी तो बरा होतो. चीनमध्ये कोणत्याही नैसर्गिक संसर्गाची सवयच नव्हती. त्यामुळे त्यांना हे सगळं फार जड जात आहे. तेव्हा कुणी घाबरून जाऊ नये. नवीन व्हेरियंट येऊ शकतात. मात्र त्यासाठी टाळेबंदी लागू करण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT