jacinda_ardern 
ग्लोबल

New Zealand:जॅसिंडा अर्डर्न यांच्या लेबर पार्टीचा निवडणुकीत मोठा विजय

सकाळन्यूजनेटवर्क

ऑकलंड- न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा अर्डर्न यांच्या सेंटर-लेफ्ट लेबर पार्टीचा निवडणुकीत मोठा विजय झाला आहे. जॅसिंडा यांच्या पक्षाला अभूतपूर्व बहुमत मिळाले असून यामुळे त्यांना त्यांचा अजेंडा पुढे राबवणे शक्य होणार आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीला हाताळताना जॅसिंडा अर्डर्न यांनी योग्य ती पाऊले उचलली होती. त्यामुळे देशात कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला होता. न्यूझीलंडच्या जनेतेने त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवला आहे.

अर्डर्न यांच्या पक्षाला एकूण 49.2 टक्के मते मिळाली आहेत. त्यामुळे 121 सदस्य असलेल्या संसदेत लेबर पार्टीला 64 जागा मिळाल्या आहेत. 1996 साली न्यूझीलंडने प्रोपोशनल वोटींग पद्धती स्वीकारल्यापासून कोणत्याही नेत्याला इतके बहुमत मिळाले नव्हते. यापूर्वी अनेक पक्षांच्या भागीदारीने सरकार स्थापन झाले आहे.

अर्डर्न यांचा पक्ष निवडणुकीत बाजी मारेल आणि सत्ता पुन्हा प्रस्थापित करेल, असे आडाखे आधीपासूनच बांधले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्यांनी निवडणूक जिंकली. उदारमतवादी आणि सर्वसमावेशक धोरणाच्या बळावर ४० वर्षाच्या जेसिंडा आर्डन यांनी मतदारांची मते मिळवल्याचे राजकीय तज्ञ सांगतात. या विजयामुळे सलग दुसऱ्यांदा जेसिंडा यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडणार आहे. यादरम्यान जेसिंडा अर्डर्न यांनी पाठिराख्याचे आभार मानले असून येत्या तीन वर्षात खूप काम करायचे आहे, असे सांगितले.

भूकबळीत भारताची दैना; खास लोकांचे खिसे भरण्यात मोदी मात्र व्यस्त

जेसिंडा अर्डन २०१७ रोजी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यानंतर त्यांना दहशतवादी हल्ला आणि कोरोना संसर्ग यासारख्या संकटांचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी संयम आणि दुरदृष्टीच्या जोरावर न्युझीलंडमध्ये सत्ता हाताळली आणि त्याचे जगभरातून कौतुकही झाले. कमी लोकसंख्येचा देश असूनही आर्डन यांनी उत्तमरित्या प्रशासकीय यंत्रणा राबविली आणि आदर्श प्रस्थापित केला. मतदानाच्या अगोदर केलेल्या जनमत चाचणीत आर्डन यांच्या मजुर पक्षाला ४६ टक्के मतदारांनी पसंती दिली होती. प्रमुख प्रतिस्पर्धी नॅशनल पार्टीला ३१ टक्के, ग्रीन पार्टीला ८ टक्के, ॲक्ट न्युझीलंड पार्टीला ८ आणि न्युझीलंड फर्स्ट पार्टीला ३ टक्के मतदारांचा पाठिंबा असल्याचे सर्वेक्षणात सांगितले होते. 

न्युझीलंडच्या निवडणुक प्रणालीनुसार प्रत्येक मतदारांना दोन मत टाकावी लागतात. न्युझीलंडच्या संसंदेत १२१ जागा असून त्यात ७१ खासदार प्रत्यक्षरुपाने तर उर्वरित ७० खासदार पक्षाला मिळालेल्या मतांच्या आधारे निवडले जातात. विरोधी पक्ष नॅशनल पार्टीच्या नेत्या ज्युडिथ कॉलिन्स यांनी पराभव मान्य केला असून दणदणीत विजयाबद्धल आर्डन यांचे अभिनंदन केल्याचेही त्या म्हणाल्या.

आर्डन यांची कोरोना काळातील कामगिरी

जगाला कोरोनाने ग्रासलेले असताना न्युझीलंडने मात्र त्यावर चांगली मात केली आहे. गेल्या तीन आठवड्यात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. नव्याने बाधित झालेले रुग्ण परदेशातून आलेले असून ते क्वारंटाइन आहेत. देशात कोविडमुळे आतापर्यंत केवळ २५ जणांचा मृत्यू झाला आहे. अर्थात न्युझीलंडसमोर आव्हाने कमी होत नाही. कोविडला रोखण्यासाठी देशाच्या सीमा परकीय नागरिकांसाठी अद्याप बंदच आहेत. त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT