honeymoon news esakal
ग्लोबल

50 वर्षांची बायको आणि 60 वर्षांचा नवरा हौसेने हनिमूनला गेले.. हॉटेलमध्ये जाताच बायको लागली रडायला

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः एक कपल मोठ्या हौसेने हनिमूनला गेलं होतं. हॉटेलच्या खिडक्या उघडल्यानंतर त्यांनी जे पाहिलं त्यानंतर पत्नी ढसाढसा रडायला लागली.

ब्रिटनच्या ५० वर्षीय एलेज फिंज आणि तिचा नवरा ६० वर्षीय कॉलिन फिंच हे हनिमूनसाठी तुर्कीला गेले होते. तिथे त्यांनी एक लक्झरी हॉलेट बुक केलं होतं.

हेही वाचा - Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

त्यांना हॉटेलकडून सांगण्यात आलं होतं की, हॉटेलच्या आजूबाजूला हिरवगार जंगल आहे. खिडकी उघडताच सुंदर वातावरण अनुभवायला मिळेल. जेव्हा हे कपल तिथं पोहोचलं तेव्हा वेगळंच काहीतरी बघायला मिळालं.

हॉटेलकडून करण्यात आलेला दावा साफ चुकीचा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. एलेज यांनी सांगितलं की, जसंच मी रुमची खिडकी उघडली तर समोर हिरवंगार काहीही नव्हतं. एक उजाड झालेलं आणि जळालेलं जंगल होतं. हे बघून मी रडायला लागले.

एलेजने पुढे सांगितलं की, एक वर्षभरापूर्वी जंगलाला आग लागली होती. तेव्हापासून हे उजाड झालेलं आहे. याबद्दल हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला काहीही सांगितलं नव्हतं. त्यांनी आमचा हनिमून बर्बाद केल्याचं तिने सांगितलं.

ज्या कंपनीमार्फत त्यांनी हे हॉटेल बुक केलं होतं त्या कंपनीने नुकसानभरपाई देण्याचं टाळलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT