Niger Soldiers Declare Coup : पश्चिम आफ्रिकन देश नायजरमध्ये सत्तापालट झाली आहे. लष्कराच्या जवानांनी तेथील अध्यक्ष मोहम्मद बझम यांना कैद केलं आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, लष्कराने राष्ट्रीय टीव्हीवर सत्तापालटाची घोषणा केली. कर्नल अमादौ अब्द्रामाने इतर लष्करी अधिकार्यांसह टीव्हीवर दिसले आणि राष्ट्रपतींना सत्तेतून काढून टाकल्याची घोषणा केली.
नायजरमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना ही घटना देशासमोरील अडचणी वाढवणारी आहे. सत्तापालटाच्या घटनेवर अमेरिकेने स्पष्टपणे सांगितलं आहे की, जोपर्यंत तिथली परिस्थिती लोकशाहीसाठी पुरक होत नाही तोपर्यंत नायजरला आर्थिक मदत मिळणार नाही, त्यावर बंदी घालण्यात येईल.
नायजर जगातील सर्वात जास्त कर्जबाजारी देशांपैकी एक आहे. येथे दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे. अर्थव्यवस्था शेती, पशुपालन आणि युरेनियमच्या निर्यातीवर हा देश अवलंबून आहे. मात्र, गेल्या अनेक दशकांपासून येथील परिस्थिती सातत्याने खालावत चालली असून आता परकीय मदत मिळण्याची आशा संपली आहे. नायजरला नेहमीच मदत करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. भारताने या देशाला शिष्यवृत्ती आणि तांत्रिकदृष्ट्याही मदत केली आहे.
नायजर आणि भारत यांच्यातील संबंध कसे आहेत हे, 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या
67 लाख किमतीचे 100 संगणक दिले
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, भारताने नायजरला अनेक वेळा मदत देऊ केली आहे. 2005 मध्ये अन्न संकटाशी लढा देत असलेल्या नायजरला औषधांसाठी मदत देण्यात आली. नायजरच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय तज्ज्ञांनी तेथे भेट देऊन कृषी क्षेत्रात तांत्रिक मदत केली. 2012 मध्ये भारत सरकारने 67 लाख रुपये किमतीचे 100 संगणक दिले होते.
अन्न संकटाचा सामना करण्यासाठी 1 लाख डॉलर्स दिले
कृषी आधारित अर्थव्यवस्था असलेला देश असूनही, नायजरमध्ये अन्न संकटाची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा भारताने अनेक वेळा मदत केली. अशाच परिस्थितीत 2010 मध्ये, भारताने नायजरला 1 लाख डॉलर्सची मदत दिली. नॅशनल टेलिव्हिजन ऑफ नायजरला टीव्ही कॅमेरा विकत घेण्यासाठी 86452 युरोची मदत केली.
शिष्यवृत्ती आणि लॅपटॉपची मदत
सप्टेंबर 2015 मध्ये, भारत सरकारने नायजर सरकारला 10 लॅपटॉप भेट दिले. नायजरमधील भारतीय दूतावासाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग दिन साजरा केला. याशिवाय 2014-15 आणि 2016-17 मध्ये नायजरच्या तरुणांना शिष्यवृत्ती उपलब्ध करून देण्यात आली. 2014-15 दरम्यान संरक्षण प्रशिक्षण देण्यात आले.
नायजरने भारतात दूतावास सुरू केले
नायजर आणि भारताचे संबंध कसे आहेत, हे यावरून समजू शकते की जेव्हा जेव्हा या देशावर आर्थिक संकट आले तेव्हा भारताने मदत केली. गेल्या दशकात दोन्ही देशांमधील संबंध सुधारले आहेत. 2011 मध्ये नायजरने भारतात दूतावास उघडला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील व्यापाराची व्याप्ती वाढली.
या गोष्टींचा व्यापार होतो
वर्ष 2014-15 मध्ये भारताने नायजरसोबत 78.77 दशलक्ष डॉलरचा व्यापार केला. भारताने नायजरला औषधे, कापूस, इलेक्ट्रिकल मशिनरी, उपकरणे आणि प्लास्टिकच्या वस्तूंची निर्यात केली. याशिवाय भारत नायजरमधून अनेक वस्तू आयात करतो. यामध्ये प्रामुख्याने कातडी आणि शिशाशी संबंधित गोष्टींचा समावेश होता. हा व्यवसाय वर्षानुवर्षे वाढला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.