माले : मालदीवचे अध्यक्ष महंमद मोईझ्झू यांनी भारतद्वेषी विधाने करणे सुरूच ठेवले आहे. मालदीवमधील भारताचे सैनिक काढून घेण्याच्या त्यांच्या आवाहनानंतर भारताकडून ही प्रक्रिया सुरू असतानाच त्यांच्या जागी सामान्य वेशातीलही कोणते भारतीय अधिकारी नकोत, अशी भूमिका मोईझ्झू यांनी घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मालदीवच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांनी टिपणी केल्यानंतर भारताबरोबरील या देशाचे संबंध तणावाचे झाले आहेत. भारतीयांनी मालदीवमधील पर्यटनावर अघोषित बहिष्कार घातल्याने या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसला आहे. या तणावातच, मालदीवमध्ये तैनात असलेली लष्कराच्या हवाई विभागाची तीन पथके १० मार्चपर्यंत माघारी बोलवावीत, अशी मागणी मालदीवने केली होती.
भारताने ही मागणी मान्य करत तीन पथकांपैकी एका लष्करी पथकाला जबाबदारीतून मुक्त करून त्यांची जागा घेण्यासाठी नागरी सेवेतील अधिकाऱ्यांचे एक पथकही मालदीवला पाठविले आहे. मात्र, १० मार्चनंतर मालदीवमध्ये भारताचा गणवेशातीलच नव्हे, तर सामान्य वेशातीलही कोणी अधिकारी नको, असे मोईझ्झू यांनी आज एका कार्यक्रमादरम्यान सांगितले.
मोईझ्झू म्हणाले,‘‘भारतीय सैनिकांना हाकलून लावण्यात आमचे सरकार यशस्वी होत असल्यानेच काही जण परिस्थितीला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.