Wuhan Institute of Virology Sakal
ग्लोबल

वुहानच्या प्रयोगशाळेत कोणीही आजारी नव्हते! डॅनिएली अँडरसन यांचा खुलासा

अँडरसन यांनी ‘ब्लूमबर्ग’शी बोलताना याबाबत चकीत करणारे खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्या माहितीनुसार वुहानच्या प्रयोगशाळेत २०१९च्या अखेरपर्यंत कोणीही आजारी पडलेले नव्हते.

वृत्तसंस्था

सिडनी - संपूर्ण जगाला महाभयानक संकटात लोटणाऱ्या कोरोना विषाणूचा (Coronavirus) उगम चीनमधील प्रयोगशाळेत (Chin laboratory) झाला असल्याचा आणि संशोधनादरम्यान तेथे काम करणारे काही संशोधक आजारी पडल्याची चर्चा असताना २०१९ अखेरपर्यंत तेथे कोणीही आजारी पडले नसल्याचा आश्‍चर्यकारक खुलासा डॅनिएली अँडरसन यांनी केला आहे. (No One in Wuhans Lab was Sick Daniella Anderson)

अँडरसन (वय ४२) या ऑस्ट्रेलियाच्या विषाणूतज्ज्ञ आहेत. चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी’ या संस्थेतील बीएसएल -४ या प्रयोगशाळेत त्यांनी संशोधन केले आहे. तथे त्या नोव्हेंबर २०१९पर्यंत काम करीत होत्या. म्हणजेच कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण चीनमध्‍ये आढळण्याच्या काही आठवड्याआधीपर्यंत त्या प्रयोगशाळेत होत्या.

अँडरसन यांनी ‘ब्लूमबर्ग’शी बोलताना याबाबत चकीत करणारे खुलासे केले आहेत. त्या म्हणाल्या की, माझ्या माहितीनुसार वुहानच्या प्रयोगशाळेत २०१९च्या अखेरपर्यंत कोणीही आजारी पडलेले नव्हते. विषाणूचे संक्रमण झाल्याची लक्षणे आढळल्यास त्याची माहिती देण्याची एक प्रक्रिया आहे. उच्च धोका असलेल्या प्रयोगशाळांमध्ये याचे पालन केले जाते. जर तेथे काम करणारे काही जण आजारी पडले असते, तर माझाही त्यात समावेश असला असता. पण मी एकदम ठणठणीत आहे. लसीकरणापूर्वी सिंगापूरमध्ये मला कोरोना चाचणी करावी लागली होती. जर मी संसर्गबाधित असते तर तसे चाचणीतून दिसले असते.

अर्धसत्य माहितीमुळे संशोधन झाकोळले

ब्लूमबर्ग’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वुहानमधील प्रयोगशाळेत कामबद्दलची माहिती प्रथमच उघड केली. ज्या वुहानमध्ये कोरोनाचा विषाणूचा उद्‍भव झाल्याचे मानले जाते, तेथील प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ पायापासून डोक्यापर्यंत संरक्षक कवच घालून संशोधन करीत होते, असे त्यांनी सांगितले. ‘‘कोरोनाचा जो विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडला, असा ठाम निष्कर्ष काढला जात आहे, त्यात कुळातील विषाणूंवर तेथे संशोधन सुरू होते. अर्धसत्य आणि विपर्यस्त माहितीमुळे प्रयोगशाळेतील कार्य आणि उपक्रम झाकोळले गेले आहेत. प्रसिद्घीमाध्यमांमधून दाखविल्या जाणाऱ्या माहितीपेक्षा हे सामान्य आहे. ते खूप कंटाळवाणे होते असे नाही, पण हा एक सामान्य प्रयोगशाळा असून अन्य उच्च नियंत्रण प्रयोगशाळेप्रमाणेच तिथे काम सुरू असते,’’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

‘बॅटवूमन’ अँडरसन

‘ब्लूमबर्ग’च्या वृत्तानुसार डॅनिएली अँडरसन या वटवाघुळांमध्ये असलेल्या विषाणूतील तज्ज्ञ आहे. वुहानमधील विषाणूविज्ञान संस्थेत संशोधन करणाऱ्या त्या एकमेव विदेशी संशोधक आहेत. आता त्या मेलबर्न येथील ‘पीटर डोहर्टी इन्स्टिट्यूट फॉर इंफेक्शन अँड इम्युनिटी’ या संस्थेत कार्यरत आहेत. ‘इबोला आणि निपाहसारख्या साथींना कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंमुळे वटवाघळांमध्ये आजार का निर्माण होऊ शकत नाही,’ हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. यासाठी त्या गुहांमध्ये विषाणूंचा शोध घेत असतात. त्यामुळेच अँडरसन यांच्या दीर्घकालिन सहकारी शी झेंगली यांनी त्यांचे नाव ‘बॅटवूमन’ असे ठेवले आहे. वुहानमध्ये इबोलावर संशोधन करणे हे त्यांच्या करिअरसाठी महत्त्वाची बाब आहे. वुहानमधील प्रयोगशाळेत काम करण्यासाठी त्यांना ४५ तासांचे प्रशिक्षण घ्यावे लागले होते. त्यात उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच त्यांना तेथे संशोधन करण्याची संधी मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT