Terrorism esakal
ग्लोबल

Terrorism : दहशतवादाकडे कोणीही दुर्लक्ष करू नये; भारताचे आवाहन

‘राजकीय कारणांसाठी आपल्या भूमीचा दहशतवादी वापर करत असल्यास कोणत्याही देशाने त्याकडे दुर्लक्ष करू नये,’

पीटीआय

ओटावा - कॅनडामध्ये दहशतवादाचे वारंवार उदात्तीकरण होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना भारताने, ‘राजकीय कारणांसाठी आपल्या भूमीचा दहशतवादी वापर करत असल्यास कोणत्याही देशाने त्याकडे दुर्लक्ष करू नये,’ असे आवाहन केले आहे.

एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात १९८५ मध्ये बाँबस्फोट होऊन विमानातील सर्व ३२९ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यामागे खलिस्तानवाद्यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेला ३९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने आणि टोरांटो व व्हँकुव्हर येथील वाणिज्य कार्यालयांनी स्मृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना भारताचे उच्चायुक्त संजयकुमार वर्मा म्हणाले, ‘जगातील कोणत्याही देशाने आपल्या भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर होऊ देऊ नये. कोणत्याही राजकीय हितापेक्षा मानवीजीवन अधिक मूल्यवान आहे. दहशतवादी कारवायांचा मानवतेला धोका निर्माण होण्यापूर्वीच त्यांच्यावर कायदेशीर आणि सामाजिक कारवाई होणे आवश्‍यक आहे.

दहशतवाद्यांचे जाळे मोडून काढण्यासाठी, त्यांचा अर्थपुरवठा खंडित करण्यासाठी आणि त्यांच्या दिशाहीन विचारधारेचा प्रतिवाद करण्यासाठी सर्व देशांनी, सुरक्षा संस्थांनी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे.’

खलिस्तानवादी हरदीपसिंग निज्जर याच्या कॅनडामध्ये झालेल्या हत्येमध्ये भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे झाले आहेत. कॅनडाच्या संसदेत काही दिवसांपूर्वीच निज्जरला श्रद्धांजलीही वाहण्यात आली होती. त्यावरून भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

दहशतवादाचे कोणतेही कृत्य निषेधार्हच असते. कनिष्क प्रकरणाला ३९ वर्षे उलटून गेली तरी अद्यापही जागतिक शांततेसमोर दहशतवादाचा धोका कायम आहे. दहशतवादाचे उदात्तीकरण करणे चुकीचे आहे. मात्र, कॅनडामध्ये असे प्रकार सर्रास घडतात हे चिंताजनक आहे.

- संजीवकुमार वर्मा, उच्चायुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT