Muhammad Yunus esakal
ग्लोबल

Bangladesh Interim government : नोबेल पारितोषिक विजेते Muhammad Yunus यांच्याकडे अंतरिम सरकारचे नेतृत्व

Swadesh Ghanekar

Bangladesh's interim government : बांगलादेशमध्ये अखेर अंतरिम सहकार स्थापनाच्या हालचालीने वेग पकडला आहे. नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस ( Muhammad Yunus ) यांची अंतरिम सरकारचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि देश सोडून भारतात गेल्यानंतर एका दिवसात ही निवड केली गेली आहे.

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदी युनूस यांच्या नावाला पहिली पसंती दिली होती. युनूस हे 'banker to the poor' म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी गरीबांसाठी लढा दिला आहे. युनूस यांना अंतरिम सरकारचे नेते बनवण्याचा विद्यार्थ्यांचा प्रस्ताव बैठकीत मान्य करण्यात आला. या बैठकीला कोटा आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी आणि तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते.

बांगलादेशी संसद बरखास्त करण्यात आल्याने ८४ वर्षीय युनूस हे तात्पुरत्या सरकारचे नेतृत्व करतील. आरक्षणावरून पेटलेल्या आंदोलनात आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी जीव गमावला आहे. बांगलादेशमध्ये नवीन सरकार स्थापन होईपर्यंत अंतरिम सरकारची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

बैठकीनंतर विद्यार्थी नेत्यांनी सांगितले की, युनूस यांच्या नेतृत्वाखाली लवकरच अंतरिम सरकार स्थापन केले जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

दरम्यान हा निर्णय होण्यापूर्वी युनूस म्हणाले होते की ‘‘ या विद्यार्थ्यांनी केलेल्या उग्र आंदोलनाची प्रचंड किंमत त्यांना मोजावी लागली आहे. विद्यार्थी एवढा मोठा त्याग करीत आहेत, देशवासीय त्याग करीत आहेत, तर माझीही काही जबाबदारी आहे, असा विचार करून मी विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली.’’ ऑलिम्पिक समितीचे विशेष निमंत्रित म्हणून युनूस पॅरिसला गेले होते. उपचारांसाठी ते अद्याप परदेशातच आहेत. ते लवकरात लवकर बांगलादेशला परतण्याची अपेक्षा आहे.

"विद्यार्थ्यांच्या वतीने माझ्याशी संपर्क साधण्यात आला तेव्हा सुरुवातीला मी नकार दिला होता. माझ्या हातातील अनेक कामे मला संपवायची आहेत. पण देशातील संकटकाळात मी सूत्रे हाती घेण्याचा आग्रह विद्यार्थ्यांनी कायम ठेवला,’’ असे युनूस म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Senate Election: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित; सुप्रिया सुळेंची सडकून टीका

IND vs BAN, Video Viral: 'मलिंगा बनलाय का, यॉर्करवर यॉर्कर', विराटचा शाकिबला प्रश्न; तर ऋषभ पंतही मागे हटेना

Family Man 3 : फॅमिली मॅन 3 मध्ये दिसणार 'हा' अभिनेता ; काही महिन्यांपूर्वीच सुपरहिट सिनेमात केलं होतं काम

Nitin Gadkari: "तर बालगंधर्व रंगमंदिराच्या छतावर लोक ड्रोननं उतरतील अन्..."; गडकरींनी सांगितला नवा प्लॅन

Latest Marathi News Live Updates: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थागित

SCROLL FOR NEXT