kim jong un guam esakal
ग्लोबल

North Korea: 'युद्धाच्या तयारीला लागा'; लष्कर प्रमुखाला पदावरुन हटवत किम जोंग उनचा सैन्याला आदेश

North Korea: उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोग उन यांनी आपल्या लष्करी प्रमुखाला पदावरुन काढून टाकले आहे.तसेच सर्व सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

North Korea Pyongyang: उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोग उन यांनी आपल्या लष्करी प्रमुखाला पदावरुन काढून टाकले आहे.तसेच सर्व सैन्याला युद्धासाठी तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. शस्त्रास्त्र निर्मिती आणि युद्ध अभ्यास प्रशिक्षण वाढवण्याच्या सुचना किंम जोग उन यांच्याकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे उत्तर कोरिया प्रमुख मोठ्या युद्धाची तयारी करत आहेत का, अशी शंका व्यक्त केली जाऊ लागली आहे. सरकारी मीडिया केसीएनए याने गुरुवारी यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

रिपोर्टनुसार, किम जोग उन यांनी केंद्रीय लष्कर आयोगाची बैठक बोलावली होती. यामध्ये उत्तर कोरियाच्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा झाली. पण, हे शत्रू नेमके कोण याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. याच बैठकीमध्ये हुकूमशाह किम यांनी जनरल स्टाफ प्रमुख पाक सु इल यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या ऐवजी योंग गिल यांना सरसेनापती बनवण्यात आलं आहे. योंग गिल हे संरक्षणमत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दोन्ही पदं असती का, याबाबत स्पष्टता देण्यात आलेली नाही. तसेच पाक सु इल यांना पदावरुन का हटवण्यात आले याबाबतही माहिती देण्यात आलेली नाही.

युक्रेन युद्धात रशियाला शस्त्र

रिपोर्टनुसार किंम जोग उन यांनी शस्त्र उत्पादन क्षमता वाढवण्याच्या सुचना दिल्या आहेत. किम यांनी मागील आठवड्यात शस्त्र उत्पादन कारखान्यांना भेट दिली होती. त्यांनी यावेळी शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना शस्त्र स्पर्धा वाढवण्याचे आवाहन केले. किम यांना नेमके कोणाविरोधात युद्ध छेडायचं आहे, याबाबत स्पष्टता नाही. दरम्यान, अमेरिकेने उत्तर कोरियावर आरोप केलाय की ते युक्रेन युद्धात रशियाला शस्त्र पुरवत आहेत. ज्यात रणगाडे, रॉकेट आणि मिसाईल यांचा समावेश आहे. रशिया आणि उत्तर कोरियाने हे आरोप फेटाळले आहेत.

काही वर्षांपूर्वी अमेरिकेचा लष्करी तळ गुआम याला लक्ष्य करण्याचा इशारा किम जोग उन यांनी दिला होता.एवढेच नव्हे, तर अमेरिकेला धडा शिकविण्यासाठी लॉस एन्जेल्स, सॅन फ्रान्सिस्को या शहरांवर अण्वस्त्र टाकण्याचीही भाषा त्याने केली होती. अमेरिकेने आपला मित्र देश दक्षिण कोरियाला १८,७५० टन वजनाची ओहिओ क्लास आण्विक बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी यूएसएस केंटुकी पाठवली आहे. यामुळे किम जोंग उन प्रशासन भडकल्याचं सांगण्यात येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

SCROLL FOR NEXT