Nuclear Winter esakal
ग्लोबल

Nuclear Winter : रशिया-युक्रेन अणुयुद्ध झालं तर येणार 'न्युक्लिअर विंटर'..जाणून घ्या धोका

सकाळ डिजिटल टीम

Nuclear Winter : अणुयुद्धामुळे प्रभावित झालेल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये जास्त धूर निघेल. हा धूर सूर्यप्रकाश रोखेल आणि पृथ्वी थंड, कोरडी होऊन अंधारात बुडून जाईल. अणु बॉम्बमुळे न्युक्लिअर विंटर येईल.1945 मध्ये अमेरिकेने हिरोशिमावर अणुबॉम्बने हल्ला केला. त्याचा परिणाम पिढ्यानपिढ्या दिसून आला. काही मिनिटांत 80 हजार लोक मारले गेले. त्या वर्षाच्या अखेरीस रेडिएशनमुळे 1.40 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.

अणुबॉम्बचे निर्माते ओपेनहायमर यांनी चाचणी केल्यानंतर सांगितले की हा स्फोट त्यांच्या अपेक्षेपेक्षा 50 पट अधिक धोकादायक होता.आता शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, आज कोणत्याही देशावर अणुबॉम्ब टाकले तर ते गेल्या वेळेपेक्षा कितीतरी पटीने अधिक विनाश घडवू शकतात. या विनाशाचे कारण त्यांनी बॉम्बसोबतच हवामानातील बदलही सांगितले आहे.

हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अण्वस्त्र हल्ल्यानंतरची परिस्थिती आणि त्यानंतर केलेले भाकित जाणून घ्यावे लागेल...

शास्त्रज्ञांनी 40 वर्षांपूर्वी सांगितले होते की अणु बॉम्बमुळे अणु हिवाळा येईल.आतापर्यंतच्या पहिल्या आणि एकमेव अणुहल्ल्याच्या प्रभावाबाबत पॉल क्रुत्झेन आणि जॉन बिर्क्स या शास्त्रज्ञांनी हल्ल्याच्या 40 वर्षांनंतर 1982 मध्ये म्हटले होते की, जर अणुयुद्ध सुरू झाले तर त्यामुळे धूर निघेल. असे ढग तयार होतील जे सूर्यापासून येणारा सूर्यप्रकाश रोखतील. सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे पृथ्वीचे तापमान कमी होईल. या संपूर्ण घटनेला न्यूक्लियर हिवाळा म्हटले जाईल. यामुळे पिके आणि संस्कृती नष्ट होईल, असा दावा शास्त्रज्ञाने केला होता.

पृथ्वी अंधारात बुडेल, उपासमारीचा धोका निर्माण होईल.

हिरोशिमावरील हल्ल्याच्या वेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियनच्या शास्त्रज्ञांनी म्हटले होते की, अणुयुद्धामुळे प्रभावित झालेल्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये जास्त धूर निघेल. हा धूर सूर्यप्रकाश रोखेल आणि पृथ्वी थंड, कोरडी आणि अंधारात बुडून जाईल.

1980 च्या दशकात, वैज्ञानिकांनी अणु हिवाळी सिद्धांतावर आधारित हवामान मॉडेल सादर केले. त्याचा तपशील धक्कादायक होता. त्यानुसार जर अणुयुद्ध झाले तर 10 वर्षांत जागतिक तापमान 10 अंश सेल्सिअसने कमी होईल. त्याचा थेट आणि वाईट परिणाम झाडांवर आणि वनस्पतींवर होईल. त्यांना आवश्यक सूर्यप्रकाश मिळणार नाही आणि ते वेळेपूर्वी कोमेजून जातील. साहजिकच याचा परिणाम जागतिक अन्न उत्पादनावरही दिसून येईल आणि त्यामुळे पुरेसे अन्नधान्य तयार होणार नाही. याचा अर्थ जगावर उपासमारीचा थेट धोका निर्माण होईल.

आता जाणून घ्या आज युद्ध झाले तर काय होईल...

गेल्या 40 वर्षांत हवामानाचे मॉडेलही बदलले आहेत. आधुनिक हवामान मॉडेल्सनुसार, आज जर अणुयुद्ध सुरू झाले तर 40 वर्षांपूर्वी जे घडले त्यापेक्षा जास्त विनाश होईल. सायन्स अलर्टनुसार, जर रशिया आणि अमेरिकेमध्ये अणुयुद्ध सुरू झाले तर अणु हिवाळा नक्कीच येईल, त्यासोबत समुद्राचे तापमानही कमी होईल. म्हणजे महासागर इतके थंड होतील की जग न्यूक्लियर हिमयुगात पोहोचेल. हा कालावधी हजारो वर्षे टिकू शकतो.

रशिया आणि अमेरिके व्यतिरिक्त, इतर 7 देश - भारत, पाकिस्तान, चीन, फ्रान्स, उत्तर कोरिया आणि ब्रिटनकडे देखील अण्वस्त्रे आहेत. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध झाले तर 13 कोटी लोकांचा मृत्यू होईल. त्याच वेळी, 250 कोटी लोकांना युद्धाच्या 2 वर्षानंतर पोटभर अन्न मिळणार नाही.

आता प्रश्न उद्भवतो की जर आपण जागतिक तापमान वाढीचं संकट सहन करत आहोत, तर अणु हिवाळा कसा येईल…ग्लोबल क्लायमेट ऑथॉरिटीजच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की जुलै 2023 हा मानवी इतिहासातील सर्वात उष्ण महिना आहे. यावर युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले - ग्लोबल वॉर्मिंगचे युग संपले आहे. हवामान बदल आला आहे. हे खूप धोकादायक आहे. मानवी क्रियाकलापांमुळे हवामान बदल होत आहेत.

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) वाढणे हे देखील तापमान वाढण्याचे एक कारण आहे. जीवाश्म इंधनाच्या जाळण्यामुळे दरवर्षी जगभरात 40 अब्ज टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जित होतो.पृथ्वी सतत गरम होत आहे. अशा स्थितीत अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे सूर्यप्रकाशात येणारा सूर्यप्रकाश रोखला जाईल. त्यामुळे तापमान वाढण्याऐवजी कमी होऊ लागेल. हळूहळू ही परिस्थिती आण्विक हिवाळ्यामध्ये बदलेल.

रशिया-युक्रेन युद्धामुळे अणुयुद्धाचा धोका वाढलाय

24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला. व्लादिमीर पुतिन यांचा यामागचा हेतू एकच होता - युक्रेन काबीज करणे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हे मान्य केले नाही, म्हणून वर्षभरानंतरही हे युद्ध सुरूच आहे. रशियाच्या विरोधात अमेरिकेसह अनेक देश युक्रेनला मदत करत आहेत. त्यामुळे अणुयुद्धाचा धोका वाढत आहे.शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, रशियाने युक्रेनविरुद्ध छोटे अण्वस्त्र वापरले तर केवळ दोन देशांमध्येच युद्ध होणार नाही, संपूर्ण जग त्यात अडकेल. याचा फटका कोट्यवधी लोकांना बसेल, कोणी कल्पनाही करू शकत नाही, असा विध्वंस होईल.

न्यूक्लियर विंटर थिअरी आतापर्यंत अणुयुद्ध रोखण्यासाठी उपयुक्त ठरली आहे

शास्त्रज्ञांच्या मते, 1980 च्या दशकातील हवामान मॉडेलपेक्षा सध्याचे हवामान मॉडेल अधिक प्रगत आहेत. या आधुनिक हवामान मॉडेल्सच्या अलीकडील निकालांवरून असे दिसून आले आहे की 40 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी दिलेला तपशील अत्यंत कमी लेखण्यात आला होता. मात्र, अणुयुद्ध रोखण्यासाठी न्युक्लियर विंटर थिअरी खूप उपयुक्त ठरल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

पर्यावरण शास्त्रज्ञ अॅलन रॉबॉक यांनी अलीकडेच सांगितले की, अणु हिवाळी सिद्धांतामुळेच अण्वस्त्रांच्या निर्मितीवर आणि वापरावर बंदी घालता आली. 1980 च्या दशकात जगात 65 हजार अण्वस्त्रे होती. आज जगात फक्त 12,512 अण्वस्त्रे आहेत. न्यूक्लियर विंटर थिअरीबाबत सादर करण्यात आलेल्या हवामान मॉडेलचा तपशील लक्षात घेऊन 1986 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठी पुढाकार घेतला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

Kolhapur South Assembly Elections 2024: निवडणूक लढवण्याची संधी द्या; कार्यकर्ते गृहमंत्री 'अमित शहा' यांच्यासमोर मांडणार भावना

Kagal Assembly Elections 2024: मुख्यमंत्र्यांसमोर मंडलिक गटाची पोस्टरबाजी ‘चेहरा नवा, विरेंद्र हवा’ चा फलक झळकवला !

Zeeshan Siddiqui Post: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची पहिली प्रतिक्रिया समोर, भावनिक पोस्ट लिहित म्हणाले...

SCROLL FOR NEXT