अटलांटिक महासागरामध्ये १९१२ साली बुडलेल्या टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेली एक पाणबुडी सध्या बेपत्ता झाली आहे. या पाणबुडीचं काम पाहणारी कंपनी ओशन गेट ने सांगितलं की या पाणबुडीमधल्या पाचही लोकांचा मृत्यू झाला आहे. (Titanic Tourist Submarine)
अमेरिकी तटरक्षक दलाचं म्हणणं आहे की त्यांच्या एका रिमोट ऑपरेटेड व्हेईकल आरओवीला टायटॅनिकच्या जवळ सर्च एरियामध्ये मलबा आढळून आला आहे. हा मलबा कोणाचा आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.
न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या अहवालानुसार, या दरम्यान सोशल मीडियावर लोक दावा करू लागले आहेत की या अपघाताची भविष्यवाणी १७ वर्षांच्या आधी २००६ मध्येच झाली होती. हे लोक आपल्या दाव्यासोबत एक ऍनिमेटेड टीव्ही शोचा व्हिडीओही शेअर करत आहेत. हा शो २००६ साली टीव्हीवर आला होता.
याच्या १७व्या सीझनच्या १० व्या एपिसोडचं शिर्षक होतं – होमर्स पॅटर्निटी कुट.यामध्ये हॅमर सिम्पसनचे वडील मॅसन फेअरबँक्स आपल्या मुलासोबत समुद्रात जाण्यापूर्वी एक भाषण देतात. ते म्हणतात, “आज माझ्या आनंदाला सीमाच नाही. मी माझ्या मुलासोबत खजिना शोधायला जात आहे. माझं स्वप्न आहे की मला जो आनंद आज झाला आहे, तोच आनंद तुम्हालाही मिळू देत.”
थोडंसं शोधल्यावर या दोघांनाही खजिन्याने भरलेल्या एका अवाढव्य जहाजाचे अवशेष सापडतात. दोघांची पाणबुडी जेव्हा पुढे निघालेली असले तेव्हा अचानक सिम्पसनची पाणबुडी एका दगडामध्ये अडकते. त्याच्या पाणबुडीतला ऑक्सिजन कमी होऊ लागतो, तो ओरडू लागतो. पण या एपिसोडचा शेवट चांगला दाखवल आहे. तीन दिवसानंतर त्याला जाग येते आणि तो पाहतो की त्याच्या आजूबाजूला त्याचा सगळा परिवार आहे.
सोशल मीडियावर या पिता पुत्राची तुलना या बुडलेल्या पाणबुडीतल्या पाकिस्तानी पिता पुत्रांशी करत आहेत. शोमधला एक भाग सध्या ट्विटरवर जोरदार शेअऱ केला जात आहे. लोकांचं म्हणणं आहे की सिम्पसन सतत काही ना काही भविष्यवाणी करत असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.