Oldest Living Creature esakal
ग्लोबल

Oldest Living Creature : पृथ्वीवर तयार झालेला हा पहिला जीव आहे आजही अस्तित्वात

कीटक, मासे आणि फुलपाखरं यांची गणना सर्वात जुन्या जीवांमध्ये केली जाते

सकाळ डिजिटल टीम

Oldest Living Creature : कीटक, मासे आणि फुलपाखरं यांची गणना सर्वात जुन्या जीवांमध्ये केली जाते. परंतु अलीकडील शोधामुळे शास्त्रज्ञ सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. शास्त्रज्ञांनी 700 दशलक्ष वर्षांपूर्वी जन्मलेल्या जगातील सर्वात जुन्या जीवाबद्दल माहिती दिली आहे.

जेलीफिश सारख्या दिसणार्‍या या प्राण्याचं नाव टिनोफोर असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. हा जीव 700 दशलक्ष वर्षांपूर्वी अस्तित्वात होता. अहवालात असं म्हटलंय की डायनासोरच्याही आधी याची उत्पत्ती झाली होती. हा जीव 23 कोटी वर्षे जुना असल्याचं सांगितलं जातंय.

C-Sponge चा दावा नाकारला

बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापिठातील संशोधकांनी त्यांच्या एका रिसर्च मध्ये म्हटलंय की, पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्राण्यांशी मिळताजुळता जीव हा टिनोफोर आहे. सध्या तो समुद्रात तरंगताना दिसतो.

सागरी प्राण्यांचे वय हा नेहमीच शास्त्रज्ञांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. याआधीही शास्त्रज्ञांनी समुद्रात सापडलेल्या स्पंजवर आपली बाजू मांडली होती. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या या नव्या संशोधनामुळे 600 दशलक्ष वर्षांपूर्वी जन्मलेल्या पहिल्या जीवांमध्ये समुद्री स्पंज असल्याच्या दाव्याचं खंडन करण्यात आलंय.

संशोधन अहवालानुसार, टिनोफोर हा पाण्यात राहणारा एक विशेष प्रकारचा जीव आहे. त्याला असलेल्या परांच्या साहाय्याने तो पाण्यात पुढे सरकतो. त्यांच्या मदतीने तो 6 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करू शकतो. हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.

संशोधक डॅनियल रोकसर म्हणतात, सर्व सजीवांचा सर्वात जुना आणि सामान्य पूर्वज सुमारे 60 ते 700 दशलक्ष वर्षे जुना आहे. पण ते मऊ शरीराचे प्राणी असल्यामुळे त्यांच्या जीवाश्म नोंदी मिळत नाहीत. परंतु त्यांच्या पूर्वजांबद्दल जाणून घेण्यासाठी आपण सध्या जिवंत प्राण्यांची तुलना करून माहिती गोळा करू शकतो.

संशोधकांच्या टीमचे म्हणणे आहे की कीटक, माश्या, मोलस्क, स्टारफिश आणि काही पृष्ठवंशी प्राणी सर्वात जुन्या जीवांमध्ये गणले जातात, पण तसं नाहीये. संशोधनानुसार, कीटकांची उत्पत्ती 500 दशलक्ष वर्षांपूर्वी झाली. जर लोकांना जुन्या प्राण्यांबद्दल विचारले तर ते कदाचित हीच नावं सांगतील. पण आतापर्यंत केलेले संशोधन वेगळीच माहिती देते. संशोधनातून हे सिद्ध झालंय की टिनोफोर हा सर्वात जुन्या जीवांपैकी एक आहे.

या संशोधनामुळे समुद्री जीवांबद्दल अनेक प्रकारची माहिती मिळते, जी भविष्यात खूप उपयोगी ठरू शकते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जलचर जीवांशी संबंधित आणखी अनेक प्रकारची माहिती समोर येण्याची शक्यता आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kannad Assembly Election 2024 Result Live: पतीविरुद्धच्या लढतीत पत्नीची बाजी, संजना जाधवांची हर्षवर्धन जाधवांना धोबीपछाड

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Pune: राहुल कुल यांच्या विजयाचा जल्लोष करताना माजी उपसरपंचाचा मृत्यू

Islampur Assembly Election 2024 Results : इस्लामपूर मतदारसंघावर जयंत पाटलांचंच वर्चस्व! निशिकांत पाटलांचा केला 'करेक्ट कार्यक्रम'

SCROLL FOR NEXT