नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटनं (Delta Variant) वर्षाच्या सुरुवातीला जगभरात मोठा धुमाकूळ घातला होता. एप्रिल-मेमध्ये भारतात या व्हेरियंटनं खूपच कमी कालावधीत लाखो लोकांचे प्राण घेतले होते. यानंतर आता नवा म्युटंट व्हेरियंट ओमिक्रॉननं (Omicron) जगाला धडकी भरवली आहे. दरम्यान, काही रुग्ण हे एकाच वेळी डेल्टा आणि ओमिक्रॉननं बाधित होत असल्याचं समोर आलं आहे. यामुळं हे दोन्ही व्हेरियंट एकत्रित येऊन 'सुपर स्ट्रेन' (Super Strain) तयार करत असल्याचा दावा लंडनमधील एका संशोधक तज्ज्ञानं केला आहे. विषाणूचा ओमिक्रॉन प्रकार हा लसींसाठी आव्हान असल्याचं मानलं जातं आहे आणि यामध्ये डेल्टा प्रकारापेक्षा 30 पट जास्त स्पाइक प्रोटीन असल्यानं तो जास्त संसर्गजन्य असल्याचं सांगितलं जात आहे. (Omicron and Delta could combine to form super strain of Covid 19 claim experts)
मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी नुकतेच युकेच्या संसदेतील विज्ञान आणि तंत्रज्ञान समितीला सांगितलं की, "सुपर स्ट्रेनकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. कारण ओमिक्रॉन हा वेगानं जगभरात पसरत चालला आहे. यासंदर्भात कोविड महामारीच्या आधी दक्षिण अफ्रिकेतून काही रिसर्च पेपर प्रकाशित झाले होते यामध्ये ज्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी आहे असे लोक नव्या आजारांना निमंत्रण देऊ शकतात असं यात म्हटलं होतं"
दरम्यान, डॉ. बर्टन यांनी युकेच्या संसदेत भीती व्यक्त केली की, कोरोनाचे हे दोन्ही प्रकार जीन्समध्ये बदल करुन अधिक धोकादायक व्हेरियंट तयार करु शकतात. म्हणजेच, लोकांना पुन्हा ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग हा पाचपट अधिक वेगानं होऊ शकतो. तसेच हा डेल्टापेक्षा कमी संसर्गजन्य असेल असं कुठेही दिसत नाही. यासंदर्भात लंडनमधील इंपेरियल कॉलेजमध्ये संशोधन झालं आहे. युके हेल्थ सिक्युरिटी एजन्सी अॅण्ड नॅशनल हेल्थ सर्व्हिस डेटाच्या आधारे हे संशोधन झालं आहे यामध्ये जे लोक २९ नोव्हेंबर आणि ११ डिसेंबरदरम्यान कोविड पॉझिटिव्ह आढळले होते, त्यांचा समावेश आहे.
लसीची स्थिती, वय, लिंग, वांशिकता, लक्षणे नसलेली स्थिती, प्रदेश आणि नमुन्याची तारीख याबाबत ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टाच्या तुलनेत 5.4 पटीने जास्त पुन्हा संसर्ग होण्याच्या जोखमीशी संबंधित आहे, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.