Omicron Virus Omicron Virus
ग्लोबल

Symptoms Of Omicron : काय आहेत ओमिक्रॉनची लक्षणे

सकाळ डिजिटल टीम

कोरोनाचा नवीन प्रकार ओमिक्रॉनची (Omicron variant) माहिती मिळाल्यानंतर सर्वजण भयभीत झाले आहेत. विषाणूच्या नवीन प्रकाराच्या आगमनामुळे जगातील सर्व देश सतर्क झाले आहेत. ओमिक्रॉन हे नवीन प्रकार (New Variant) प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळले. जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केली आहे. याचे रुग्ण वाढत असल्याने भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण होत आहे की ओमिक्रॉन प्रकाराची लक्षणे (Symptoms) काय आहेत?

कोरोनाचा नवीन प्रकार आल्यानंतर अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह अनेक देश दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांबाबत सावध झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेचा प्रवास करून परतणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर उतरताच क्वारंटाईन केले जात आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजने सांगितले की, ओमिक्रॉन व्हायरस शरीरात प्रवेश करत असेल तर काही विशेष लक्षणे दिसत नाहीत. डेल्टा प्रमाणेच ओमिक्रॉनची लागण झालेले काही लोक देखील लक्षणे नसलेले होते. एनआयसीडीने कबूल केले की ओमिक्रॉनची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये कोणतीही वेगळी लक्षणे दिसत नाहीत.

सद्या SARS-CoV-2 PCR हा प्रकार पकडण्यास सक्षम आहे. नवीन प्रकार पाहता भारतासोबतच इतर अनेक देशही सतर्क झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल आणि चाचणी करावी लागेल, असे व्हायरसच्या तपासाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत

२४ नोव्हेंबर रोजी ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला होता. या विषाणूचा पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. अनेक देश ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकाराने जगातील सर्व देशांची चिंता वाढवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT