Oscars Award Trophy Truth : चित्रपट क्षेत्रात सर्वात मानाचा समजला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर समजला जातो. जगभरातले कलाकार यासाठी वाट पाहत असतोत. या पुरस्कार सोहळ्यात जगभरातून आपला सिनेमा निवडला जाणं हेसुद्धा मानाचं समजलं जातं. विजेत्याला यात एक ट्रॉफी दिली जाते. ही सोनेरी बाहुली आपल्याला मिळणे फार सन्मानाचं समजलं जातं. त्यासाठी अनेक कलाकारांचे प्रयत्न असतात. पण ही सोनेरी बाहुली खरच सोन्याची असते का? ती बाहुली किती रुपयांची आहे? असे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात.
यंदा पुरस्काराचे ९५ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यंदापण लॉस एंजेलिसमध्ये हा सोहळा पार पडला. या सोहळ्यासाठी लाखो रुपये खरेच केले जातात.
यंदा ऑस्करमध्ये एक एलिफेंट व्हिस्पर' या शॉर्ट फिल्मने बेस्ट शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. सोहळ्यात भारताला चार नामांकनं मिळाली होती. त्यापैकी 'एक एलिफेंट व्हिस्पर' या शॉर्ट फिल्मला मिळाले होते. ४१ मिनिटांचा हा लघुपट हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर भाष्य करतो.
ऑस्करच्या सोनेरी ट्रॉफीचं सत्य
वृत्तांनुसार ऑस्कर विजेत्या कलाकराला मिळालेली सोनेरी रंगाची बाहुली तांब्याची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचं कोटींग असतं.
पण दुसऱ्या महायुद्धानंतर धातूंची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे ही ट्रॉफी प्लास्टरमध्ये तयार करण्यात आली.
ट्रॉफीची किंमत ४०० डॉलर आहे. भारतीय चलनात साधारण ३ लाख रुपये आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.