ग्लोबल

Pablo Picasso: कचऱ्यात सापडलेल्या जुन्या पेंटिंगने बनवलं 55 कोटी रुपयांचा मालक; जगप्रसिद्ध चित्रकाराच्या चित्राचा 62 वर्षांनी लागला शोध

संतोष कानडे

पाब्लो पिकासो हे विसाव्या शतकातील एक महान चित्रकार होते. त्यांनी जगाला अनेक कलाकृती बहाल केल्या आहेत. यामध्ये गुएर्निका, स्पॅनिशचं गृहयुद्ध, प्रोटो-क्युबिस्ट यासारखे बरेच पेटिंग्स प्रसिद्ध आहेत. आपल्या घरातल्या भिंतींवर पिकासोंनी रेखाटलेलं चित्र असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. परंतु नुकताच एक असा प्रकार समोर आला ज्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या.

गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, १९६२ मध्ये लुइगी लो रोसो यांना एक पेंटिंग सापडले होते. त्यांनी ते पेंटिंग आपल्या पॉम्पेई येथील आपल्या घरी लटकावून ठेवले होते. लुइगी यांना या पोर्ट्रेटची किंमत आतापर्यंत माहितीच नव्हती. जवळपास ५५ कोटींपेक्षा जास्त किंमतीचं हे पेंटिंग आहे. लो रॉसोचा मुलगा अँड्रिया याने या चित्राची महती शोधून काढली. त्यासाठी अनेक वर्षे खर्ची पडली.

पेंटिंग आणि त्यावरच्या स्वाक्षरीची खात्री झाल्यानंतर लुइगी लो रोसो यांच्या कुटुंबाने तज्ज्ञांशी संवाद साधला. जुन्या कलांचे जाणकार आणि अभ्यासक मॉरिझियो सेरासिनी यांच्याशीही त्यांनी संपर्क केला.

ग्राफोलॉजिस्ट आणि आर्केडिया फाऊंडेशनच्या संधोशन समितीचे सदस्य सिंझिया अल्टेरिया यांनी या कलाकृतीबाबत पुष्टी केली. हे चित्र पिकासोंचं असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर मला स्वाक्षरींचा अभ्यास करण्याचं काम देण्यात आलेलं होतं. अनेक महिने मी यावर संशोधन केलेलं आहे. त्यामुळी ही स्वाक्षरी पिकासोंची असल्याबाबत अजिबात शंका नाही.

लो रॉसोच्या निधनानंतर त्यांचा मुलगा अँड्रिया जे सध्या ६० वर्षांचे आहेत, त्यानी या चित्राबाबत माहिती दिली. त्यांच्या वडिलांना हे चित्र त्यांच्या अँड्रिया यांच्या जन्माआधी सापडले होते. परंतु त्यांना या चित्राबाबत कसलीही कल्पना नव्हती.

अँड्रिया यांनी सांगितलं की, माझे वडील मुळचे कॅप्रीचे होते. ते कचरा साठवून त्यातल्या वस्तू किंवा कचरा विकायचे. त्यांना पिकासो यांचं चित्र सापडलं होतं. मी त्यांना या चित्राबद्दल सांगत होते. मी याचा शोध घेईन आणि स्वाक्षरीही तपासून बघेन, पण मला अनेक वर्षे ते जमले नाही. आता हे चित्र ५५ कोटींपेक्षा जास्त किंमतीचं असल्याचं लक्षात आलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: फडणवीसांच्या सभेत शिरला साप; भाषण मध्येच थांबवलं अन्....; व्हिडिओ व्हायरल

कर्मयोगी आबासाहेब'मधून उलगडणार दिग्गज व्यक्तिमत्त्व; 'हा' मराठी अभिनेता साकारणार गणपतराव देशमुख यांची भूमिका

Badlapur Crime: बदलापूर प्रकरणातील दोन्ही सहआरोपींना कोर्टाकडून जामीन मंजूर, तरी पोलिसांकडून अटक

BIGG BOSS Hindi: बिग बॉसच्या घरामध्ये दिसणार गुणरत्न सदावर्ते; 'अशी' होणार ग्रँड एन्ट्री

Pune School Crime: पुण्यात तणाव! लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची व्हॅन कार्यकर्त्यांनी फोडली; वंचित आक्रमक

SCROLL FOR NEXT