Imran Khan attack Opposition e sakal
ग्लोबल

पाकिस्तानचे माजी PM इम्रान खान यांच्यावर चोरीचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर भेटवस्तू चोरून दुबईत विकल्याचा आरोप केला आहे. शाहबाज शरीफ म्हणाले की, इम्रान खानने तोशाखान्यातून भेटवस्तू चोरल्या आणि दुबईत विकल्या हे मी सिद्ध करू शकतो.

शाहबाज शरीफ यांनी इस्लामाबादमध्ये पत्रकारांच्या इफ्तार पार्टीत सांगितले की, इम्रान खानने 140 मिलीयन इतक्या किंमतीत भेटवस्तू विकल्या आहेत. शाहबाज शरीफ यांच्या म्हणण्यानुसार, इम्रान खानने दुबईमध्ये ज्या भेटवस्तू विकल्या आहेत त्यात हिऱ्यांचे दागिने सेट, ब्रेसलेट आणि घड्याळे आहेत. शाहबाज शरीफ म्हणाले- मलाही एकदा एवढे महागडे घड्याळ मिळाले होते जे मी तोशाखान्यात जमा केले होते.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की पूर्वी, एका व्यक्तीने इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारकडून तोशाखान्यात असलेल्या वस्तूंची तपशीलवार माहिती मागितली होती. ही मागणी फेटाळून लावताना इम्रान खान म्हणाले होते की, ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट, 1923 अंतर्गत ही माहिती सार्वजनिक करता येणार नाही. इम्रान सरकारमधील मंत्री आणि त्यांचे विश्वासू फवाद चौधरी यांनी शाहबाज शरीफ यांच्या आरोपांना बकवास म्हटले आहे. असे आरोप करून शाहबाज शरीफ यांना इम्रान खान यांच्यावर चिखलफेक करायची आहे, असे फवाद चौधरी म्हणाले.

फवाद चौधरी म्हणाले, की इम्रान खान यांनी पाकिस्तान सरकारकडून घड्याळ खरेदी केले होते, जे सरकारला परदेशातून मिळाले होते. ते म्हणाले की, इम्रान खान यांनी पाकिस्तान सरकारकडून विकत घेतलेले घड्याळ विकले तर त्यात गैर काय? ते घड्याळ 50 दशलक्ष किंवा 100 दशलक्ष किमतीचे असले तरी काय फरक पडतो, ते घड्याळ त्यांनी विकले. यात आक्षेप कुठे आहे? फवाद चौधरी पुढे म्हणाले की मला समजत नाही की शाहबाज शरीफ यांच्यावर आरोप काय आहेत?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT