अबोटाबाद येथील जिना इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये महिलेनं 7 मुलांना जन्म दिला.
अबोटाबाद : पाकिस्तानमध्ये (Pakistan) गेल्या आठवड्यात 7 मुलांना जन्म देणाऱ्या आईच्या 6 मुलांचा मृत्यू झालाय. आता एकच मुलगा शिल्लक राहिला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. डॉक्टरांच्या मते, महिलेची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी (Premature Delivery) झाली होती. त्यामुळं सर्व मुलं खूप अशक्त होती. प्रत्येकाचं वजन सुमारे एक किलोग्रॅम होतं. जन्मापासूनच त्यांच्यात अनेक समस्याही दिसत होत्या.
अबोटाबाद (Abbottabad) येथील जिना इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये (JIHA) महिलेनं 7 मुलांना जन्म दिला. जन्मापासूनच डॉक्टर त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. जन्मानंतर मुलांना अयूब टेक्निकल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. गेल्याच आठवड्यात सर्वात मोठ्या मुलाचा (मुलगा) जन्माच्या दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर तीन मुलींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे दिसून आले. मात्र, नंतर मुलींचाही मृत्यू झाला. त्यानंतर एका मुलाचा मृत्यू झाला. तर मंगळवारी सहाव्या मुलाचा देखील मृत्यू झालाय, तोही मुलगाच होता.
'द एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, या मुलांचा जन्म Gina International Hospital मध्ये झाला होता, परंतु त्यांच्या पालकांच्या सांगण्यावरून त्यांना खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. त्याचवेळी या पाच मुलांचा मृत्यू झाला. यानंतर मुलांना अयूब रुग्णालयात आणण्यात आलं. येथे मंगळवारी सहाव्या बालकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. अयूब हॉस्पिटलचे प्रभारी डॉक्टर एजाज हुसेन म्हणाले, 6 मुलांचा मृत्यू झाला असून सातव्या मुलाला वाचवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, त्याची प्रकृतीही सध्या धोक्याबाहेर नाही. प्री-मॅच्युअर डिलिव्हरीमध्ये अनेकदा अशा समस्या उद्भवतात, असं त्यांनी सांगितलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.