Pakistan Army Chief  Sakal
ग्लोबल

Pakistan Army Chief Property : देशात मारामार अन् लष्करप्रमुखांचं कुटूंब 6 वर्षात मालामाल

बाजवा यांची सून बनण्यापूर्वी महनूर साबिर नावाच्या तरुणीच्या संपत्तीतदेखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Pakistan Army Chief Property : पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या पत्नीच्या संपत्तीत अचानक मोठी वाढ झाल्याचे समोर आले आहे. बाजवा यांच्या पत्नी आयशा यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षात अनेकपटींनी वाढ झाल्याने पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतचा खुलासा एका पाकिस्तानी वेबसाइटने केला असून, रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

रिपोर्टनुसार, बाजवा यांची सून बनण्यापूर्वी महनूर साबिर नावाच्या तरुणीच्या संपत्तीतदेखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जनरल बाजवा यांची पत्नी आयशा सहा वर्षात अब्जाधीश झाली आहे. इस्लामाबाद, कराची,लाहौर या शहरांमध्ये त्यांच्या मालकीचे अनेक प्लॉट आणि प्लाजा आहेत. गेल्या सहा वर्षात त्यांनी लाहौरच्या फेज IV आणि फेज VI मध्ये दोन कमर्शियल प्लाजाददेखील खरेदी केले आहेत. तसेच त्यांच्या अमेरिकन बँक खात्यात कोट्यावधी रुपये जमा आहेत.

प्लॉटची माहिती देण्यास विसरले बाजवा

वर्ष २०१३ मध्ये इनकम टॅक्स रिटर्नमध्ये बाजवा यांनी पत्नी केवळ तीन संपत्तीची मालकीण असल्याचे सांगितले होते. लाहौरमध्ये दोन कमर्शियल प्लॉट आणि एक इस्लामाबाद येथील संपत्तीची एकूण किंमत ७० लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, लष्कर प्रमुख झाल्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी संपत्तीच्या विवरणात तीन वेळा बदल केला आहे. २०१३ च्या संपत्तीत बाजवा यांनी लाहौर येथील प्लॉटचा देखील समावेश केला होता. मात्र, सुरूवातीच्या काळात या प्लॉटची माहिती देण्यास विसरल्याचे बाजवा यांनी म्हटले आहे.

२०१६ मध्ये आयशा यांनी पहिल्यांदा फाइल केले होते रिटर्न

विशेष म्हणजे लष्करप्रमुख बनल्यानंतर ६ वर्षांनी बाजवा यांनी याबाबत माहिती दिली आहे. आयशा अमजद यांनी २०१६ मध्ये टॅक्स फायलर म्हणून रजिस्ट्रेशन केले होते. यानंतरच काही दिवसांनी बाजवा याचे नाव लष्करप्रमुख पदासाठी चर्चेत आले होते. विशेष म्हणजे बाजवा लष्करप्रमुख बनवण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी त्यांच्या पत्नीने इनकम टॅक्स रिटर्न फाईल केले होते.

२०१५ मध्ये संपत्ती होती शून्य

आयशा यांनी २०१६ मध्ये माहिती देताना ८ संपत्तींबाबत सांगितले होते. परंतु, याबाबत सविस्तर खुलासा केला नव्हता. २०१८ मध्ये या विवरणात बदल करण्यात आला होता. यावेळी बाजवा हे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख होते. बाजवा यांच्या पत्नीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष २०१५ मध्ये त्यांची संपत्ती शून्य होती. तर २०२१ मध्ये यात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

२०२१ मध्ये झाल्या अब्जाधीश

अवघ्या ६ वर्षांच्या कालावधीत त्यांच्या परदेशातील खात्यात ५,९१,८३१ अमेरिकन डॉलर्स जमा झाले होते. ज्याचे पाकिस्तानी रुपयात याचे मुल्य जवळपास ५,९८,४६,३३० रुपये होते. रिपोर्टनुसार, गेल्यावर्षी त्यांची संपत्ती २.२२ अब्ज रुपये होती. वर्ष २०१६ ला बाजवा यांच्या नियुक्तीनंतर ६ वर्षात संपत्ती शून्यावरून २.२२ अब्जावर पोहचली आहे. यात कमर्शियल प्लॉट, रेसिडेंशियल प्लॉट आणि सैन्याकडून त्यांच्या पतीला देण्यात आलेल्या घराचा समावेश नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT