पाकिस्तानी (Pakistan) लष्कराचे हेलिकॉप्टर (Army Helicopter) उत्तर-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात सोमवारी रात्रीपासून बेपत्ता झाले होते. लष्कराच्या हेलिकॉप्टरचे अवशेष लसबेला जिल्ह्यातील मुसा गोठाजवळ सापडले. या दुर्घटनेत सहा जवानांचा मृत्यू झाला आहे. तसेच त्यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. (Pakistan Army Helicopter Accident News)
लसबेला जिल्ह्यातील मुसा गोठ येथे हेलिकॉप्टरचे (Helicopter) अवशेष सापडले आहे. यामध्ये लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांच्यासह सर्व ६ अधिकारी आणि जवानांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे आयएसपीआरचे महासंचालक (डीजी) यांनी ट्विट केले आहे.
पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या जवानांच्या (Death) मृत्यूने देशाला खूप दुःख झाले आहे. लेफ्टनंट जनरल सरफराज अली आणि पाकिस्तानी लष्करातील इतर ५ अधिकाऱ्यांच्या हौतात्म्याने देशाला दु:ख झाले आहे. पूरग्रस्तांना मदत देण्याचे उदात्त कार्य ते करीत होते. या सुपुत्रांचा देश सदैव ऋणी राहील. मी शोकाकुल कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो, असे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ म्हणाले.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. लष्कराचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. ही अत्यंत दुःखद बातमी आहे. विमानातील सर्व ६ अधिकारी शहीद झाले आहेत. शहीदांच्या कुटुंबीयांना माझ्या संवेदना आहे. लेफ्टनंट जनरल सरफराज अली यांना जाणून घेण्याचा विशेषाधिकार मला मिळाला. ते अतिशय प्रामाणिक माणूस होते.
हेलिकॉप्टरचा एटीसीशी संपर्क तुटला
हेलिकॉप्टरमध्ये १२ कॉर्प्स कमांडर जनरल सरफराज अली आणि इतर पाच वरिष्ठ लष्करी अधिकारी होते. ते बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या पूरमदत कार्यावर लक्ष ठेवून होते. बचावकार्यात गुंतलेल्या या विमानाचा एटीसीशी संपर्क तुटला होता. हेलिकॉप्टर पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी गेले होते, असे आयएसपीआरने सांगितले.
पुरात हजारो लोक अडकले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हेलिकॉप्टरचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी (ATC) संपर्क तुटला आणि ते बेपत्ता झाले. पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तान, सिंध, गिलगिट-बाल्टिस्तान आणि खैबर पख्तूनख्वामधील पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये बचाव आणि मदत कार्यात गुंतले होते. पुरात हजारो लोक अडकले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.