Pakistan New Year eSakal
ग्लोबल

Pakistan New Year : पाकिस्तानात होणार नाही नववर्षाचा जल्लोष, सरकारने दिली सूचना; काय आहे कारण?

इस्राइलने केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील सुमारे 9,000 लहान मुलं आणि इतर नागरिकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यांच्या माध्यमातून इस्राइलने हद्द पार केली आहे; असंही काकर म्हणाले.

Sudesh

Pakistan Bans New Year Celebration : यावर्षी पाकिस्तानात नववर्षाचा जल्लोष होणार नसल्याचं सरकारने घोषित केलं आहे. देशाचे काळजीवाहू पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी याबाबत माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या इस्राइल आणि हमासच्या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला आहे. यामध्ये पॅलेस्टिनी नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि इस्राइलचा निषेध करण्यासाठी पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणाले, की पॅलेस्टाईनमधील भयानक परिस्थिती पाहता; आमच्या पॅलेस्टिनी भावंडांसोबत उभं राहणं आमचं कर्तव्य आहे. यामुळेच सरकार नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनवर बंदी जाहीर करत आहे. (Pakistan New Year)

इस्राइलने केलेल्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील सुमारे 9,000 लहान मुलं आणि इतर नागरिकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यांच्या माध्यमातून इस्राइलने हद्द पार केली आहे; असंही काकर म्हणाले. एबीपीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Israel Hamas War)

जगभरातील मुस्लिमांचा रोष

पाकिस्तानसोबतच जगभरातील कित्येक मुस्लिम राष्ट्र गाझा पट्टीच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. पॅलेस्टाईन आणि वेस्ट बँकमध्ये निष्पाप जीवांची हत्या होत असल्याचा आरोप त्यांनी इस्राइलवर केला आहे.

पाकिस्तान सध्या पॅलेस्टाईनला मदत पाठवण्याच्या तयारीत आहे. काकर यांनी यापूर्वीही आंतरराष्ट्रीय स्तरावर पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या नरसंहाराचा मुद्दा पुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे. (Israel Attacks Gaza)

गाझामध्ये काय परिस्थिती?

गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, इस्राइल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 हजारांहून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या युद्धामुळे गाझा पट्ट्यातील 23 लाख नागरिकांपैकी 85 टक्के लोक बेघर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT