इस्लामाबाद : तीन फेब्रुवारी रोजी बलुचिस्तानमध्ये लष्कराच्या दोन ठिकाणांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांसाठी पाकिस्तानने भारत (India) आणि अफगाणिस्तानला जबाबदार ठरवले आहे. पाकिस्तान (Pakistan) इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलशन्स (ISPR)विभागाने म्हटले की नौशक आणि पंजगूर जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांच्या कॅपवरील हल्ल्यांमध्ये १३ दहशतवादी मारले गेले आणि एका लष्करी अधिकाऱ्यासह सात जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानी वृत्तपत्र डाॅनच्या एका वृत्तानुसार आयएसबीआरने सुरुवातीच्या परिणामाच्या आधारावर सांगितले, की गुप्तचर संस्था अफगाणिस्तान (Afghanistan) आणि भारतात दहशतवादी व त्यांचे प्रमुखांदरम्यान संवादाला इंटरसेप्ट केले होते. डाॅनच्या एका वृत्तानुसार अफगाणिस्तान नेहमी म्हणत आला आहे, की ते अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर पाकिस्तानच्या विरोधात होऊ देणार नाही. अशा स्थितीत हे निराशाजनक करणारी घटना घडली आहे. (Pakistan Blamed On India And Afghanistan For Terrorist Attacks On Army)
पाकिस्तान लष्कर आणि बलुचिस्तान सरकारच्या माहितीत अंतर ?
पाकिस्तान लष्करानुसार पंजगुरमध्ये आताही कारवाई सुरुच आहे. येथे चार ते पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरले आहे. प्रसिद्धी पत्रकानुसार नौशकमध्ये कर्तव्यावर असताना तीन जवान आणि एक अधिकारी शहीद झाले आहेत. चार सैनिक जखमी झाले आणि इतर तिघांना पंजगूरमध्ये गोळीबारात आपला जीव गमवावा लागला. बलुचिस्तानच्या मुख्यमंत्र्यांचे गृह आणि जनजातीय विषयक सल्लागार जियाल्लाह लंगोव म्हणाले, की सुरक्षा दलांनी नौशकमध्ये आपली मोहिम पूर्ण केली आहे. मात्र पंजगूर बाजार भागात आताही कारवाई सुरुच आहे. (Terrorist Attacks On Army In Pakistan)
नौशक आणि पंजगूरमध्ये सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांदरम्यान झालेल्या गोळीबारात १५ दहशतवादी मारले गेले. १२ जवान शहीद, तर २३ जवान जखमी झाले आहेत, असे ते म्हणाले. यामागे विदेशी हात असल्याचे नाकारता येत नाही. दहशतवादी विदेशातील त्यांच्या प्रमुखांचे संपर्क होते. मात्र लंगोव यांनी प्रत्यक्ष कोणत्याही देशाचे नाव घेतले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.