इस्लामाबाद: पाकिस्तानी सैन्याच्या प्रवक्त्याने काल गुरुवारी असा आरोप केला आहे की, एक तीव्र गतीने उडणारी एक वस्तू पाकिस्तानमधील मियां चन्नू भागामध्ये परवा बुधवारी येऊन क्रॅश झाली आहे. यामुळे नागरिकांच्या काही मालमत्तांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जरनल बाबर इफ्तेखार यांनी म्हटलंय की, हे फ्लाईंग ऑब्जेक्ट भारताकडून लाँच करण्यात आलंय आणि खाली पडण्याआधी ते जवळपास तीन मिनिटे हवेमध्ये होतं. त्यांनी म्हटलंय की,पाकिस्तानमध्ये पडण्याआधी त्याने जवळपास 260 किमीचं अंतर पार केलंय. पाकिस्तानी मीडिया हे ऑब्जेक्ट म्हणजे मिसाईल असल्याचं सांगत आहे.
रावळपिंडीमध्ये एका प्रेस कॉन्फरन्सला संबोधित करताना इंटर-सर्व्हीस पब्लिस रिलेशन्स (ISPR) चे डायरेक्टर मेजर जनरल बाबर इफ्तेखार यांनी म्हटलंय की, पाकिस्तानने या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केलाय आणि भारताकडे याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे.
इफ्तेखान यांनी काल गुरुवारी मीडियाला माहिती देताना म्हटलं होतं की, बुधवारी सायंकाळी 6.43 वाजता पाकिस्तान एअरफोर्सच्या एअर डिफेन्स ऑपरेशन सेंटरद्वारे भारतीय क्षेत्रामध्ये हाय-स्पीड फ्लाईंग ऑब्जेक्ट उडताना दिसून आला. त्यानंतर ते ऑब्जेक्ट अचानक पाकिस्तानी क्षेत्राकडे कूच करु लागलं आणि त्याने पाकिस्तानी हवाई क्षेत्राचं उल्लंघन केलं आणि सरतेशेवटी 6.50 वाजता मियां चन्नू जवळ ते कोसळलं. त्यांनी म्हटलंय की, या मिसाईल सदृश्य ऑब्जेक्टमुळे नागरिकांच्या संपत्तीचं नुकसान झालं. मात्र, कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.
त्यांनी म्हटलंय की, पाकिस्तानी वायू सेना (PAF)ने फ्लाईंग ऑब्जेक्टच्या संपूर्णपणे निरीक्षण केलं आहे. PAFनुसार, हे फ्लाईंग ऑब्जेक्ट भारतातील सिरसा (हरियाणा) पासून उड्डाण सुरु केलं होतं आणि त्याचा शेवटचा टप्पा पाकिस्तानातील मियां चन्नूजवळ होता. पुढे त्यांनी म्हटलंय की, PAF च्या SOP नुसार ही एक ठरवून केलेल्या सामरिक कारवाईची सुरुवात आहे. या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय तसेच देशी उड्डाणांसहित जमिनीवर मानवी जीवन आणि संपत्ती दोन्ही बाबींना धोक्यात टाकलं आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.