Pakistan Bomb Attack Esakal
ग्लोबल

Pakistan Bomb Attack: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तानात दोन बॉम्बस्फोट; २८ ठार, अनेक जण जखमी

Pakistan Bomb Attack: सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हल्ल्याची तीव्रता वाढली आहे. आज बलुचिस्तानमध्ये एकामागून एक दोन स्फोट झाले. यात २८ जण ठार झाले.

सकाळ वृत्तसेवा

पाकिस्तानात उद्या (ता. ८) सार्वत्रिक निवडणूक होत असताना आज बलुचिस्तानमध्ये एकामागून एक दोन स्फोट झाले. यात २८ जण ठार झाले. पहिला स्फोट पिशिन शहरात झाला आणि त्यात १५ जण मारले गेले आणि ३० जण जखमी झाले तर दुसरा स्फोट बलुचिस्तानातील किला सैफुल्लाह शहरात झाला. यात १३ जण ठार तर दहा जण जखमी झाले.

अपक्ष उमेदवार असफंद यार खान कक्कर यांचे पिशिन शहरातील कार्यालयाबाहेर स्फोट झाला. त्यावेळी काकड कार्यालयात नव्हते. मात्र या स्फोटात पंधरा जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले. त्याचवेळी किला सैफुल्लाह शहरात जमियत उलेमा ए इस्लाम (जेयुआय-एफ) पक्षाचे उमेदवार मौलाना अब्दुल वासे यांच्या कार्यालयाबाहेर झाला. ते सुरक्षित आहेत. मात्र या हल्ल्यात १३ जण ठार झाले आणि दहा जण जखमी झाले.

पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने हल्ल्यासंदर्भात बलुचिस्तानच्या मुख्य सचिवाकडे आणि पोलिसांकडे अहवाल मागितला आहे. या हल्ल्याचा बलुचिस्तानचे मुख्यमंत्री अली मर्दान डोमकी यांनी निषेध केला आहे. शांततापूर्ण मार्गाने निवडणूक प्रक्रिया सुरू असताना समाजकंटकांकडून कारस्थान रचले जात असल्याचे डोमकी म्हणाले. जखमींना सर्वोतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. बलुचिस्तानचे काळजीवाहू माहिती मंत्री अचकजई म्हणाले, प्राथमिक तपासांत एका दुचाकीवर स्फोटके ठेवल्याचे निदर्शनास आले, मात्र दुसऱ्या स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही.

शरीफ, इम्रान, बिलावल यांचे राजकीय भवितव्य ठरणार

पाकिस्तानात द्विसदनीय संसदीय व्यवस्था असून त्यात नॅशनल असेंब्लीसाठी बहुतांश सदस्य जनतेतून निवडून येतात. नॅशनल असेंब्लीत ३३६ जागा असून त्यापैकी २६६ जागांसाठी मतदान होणार आहे. त्याचवेळी ६० जागा महिलांसाठी आणि दहा जागा बिगर मुस्लिम प्रतिनिधींसाठी राखीव असतात. पंजाब प्रांतात सर्वाधिक १४१ जागा, सिंध प्रांतात ७५, खैबर पख्तुनख्वा प्रांतात ५५, बलुचिस्तानात २० आणि इस्लामाबादेत तीन जागा आहेत. पाकिस्तानात १२.८५ कोटी मतदार असून ही संख्या एकुण लोकसंख्येच्या निम्मीच आहे. यात ६.९ कोटी पुरुष तर ५.९ कोटी महिला मतदार आहेत. २०१८ रोजीच्या निवडणुकीत ५२ टक्के मतदानाची नोंद झाली होती. पाकिस्तानच्या निवडणुकीत ५१२१ उमेदावर मैदानात असून त्यात ४८०६ पुरुष आणि ३१२ महिला आणि दोन तृतियपंथीय उमेदवार आहेत.

५१२१ उमेदवार नोंदणीकृत १६७ पक्षांकडून किंवा अपक्ष लढत आहेत. या निवडणुकीत प्रमुख पक्षांत माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज) (पीएमएल-एन), बिलावल भुट्टो आणि असिफ अली झरदारी यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांचा उल्लेख करता येईल. इम्रान खान यांच्या तेहरिके इन्साफ (पीटीआय) चे निवडणूक चिन्ह आयोगाने गोठविले आहे. त्यामुळे पीटीआयचे उमेदवार अपक्ष म्हणून मैदानात आहेत.

किती मतदान केंद्र

८ फेब्रुवारी सार्वत्रिक निवडणूक होत असताना ९०, ५८२ मतदान केंद्र असून त्यापैकी १७५०० मतदान केंद्र अत्यंत संवेदनशील आहे. संवेदनशील मतदान केंद्राची संख्या ३२,५०८ असून सामान्य मतदान केंद्रांची संख्या सुमारे ४२ ५०० आहे. पाकिस्तानात मतपत्रिकेतून मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाते. यासाठी साडेसहा लाख सुरक्षा सैनिक तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT