Nawaz Sharif Sakal
ग्लोबल

Pakistan Election : रणधुमाळी पाकिस्तानची : पाकिस्तानमध्ये त्रिशंकू स्थिती

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या निकालाचा कल पाहता कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे दिसत आहे.

पीटीआय

इस्लामाबाद - पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या निकालाचा कल पाहता कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचे दिसत आहे. मतदानाला दोन दिवस लोटले तरी पूर्ण निकाल हाती न आल्याने निवडणूक आयोगावर गैरप्रकाराचा ठपका ठेवला जात आहे.

पीएमएल-एनचे नेते नवाज शरीफ यांनी पाकिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी बोलणी सुरू केली असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. मात्र यात काही दिवस लागू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. ‘पीपीपी’चे माजी अध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी निवडणुकीच्या काळातच बिलावल भुट्टो झरदारी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, असे जाहीर केले होते.

त्याचवेळी नवाज शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होण्याची तयारी करत आहेत. उभय पक्षात आघाडीचे संकेत मिळत असले तरी पंतप्रधानपदाचा मुद्दा हा कळीचा राहू शकतो. ‘पीटीआय’च्या नेतृत्वांनी पक्षार्तंगत चर्चा सुरू केली असून निवडून आलेले उमेदवार कोणत्या पक्षाच्या माध्यमातून सत्तेत येऊ शकतात, यावर मंथन सुरू केले आहे.

अर्थात आगामी सरकार आघाडीचे आणि बहुपक्षीय राहू शकते आणि त्यामुळेच देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी कठोर निर्णय घेण्याऐवजी विद्यमान राजकीय स्थिती तापदायक ठरू शकते. म्हणून पाकिस्तानात इतक्यात स्थिरता प्रदान होईल, असे चिन्ह दिसत नाहीत.

इम्रान खान यांना १२ प्रकरणांत जामीन

माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मेच्या हिंसाचारातील १२ खटल्याप्रकरणी रावळपिंडीच्या दहशतवाद विरोधी न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तसेच इम्रान खान यांचे सहकारी आणि माजी परराष्ट्रमंत्री शाहा महमूद कुरेशी यांना देखील १३ प्रकरणात जामीन दिला आहे.

निवडणूक निकालात ‘पीटीआय’ पुरस्कृत अपक्ष उमेदवारांनी बाजी मारलेली असताना इम्रान खान यांना जामीन मिळाल्याने समर्थकांनी आनंद व्यक्त केला आहे. याशिवाय इम्रान खान यांना सैनिकी संग्राहालयावरील हल्ला प्रकरणातूनही जामीन मिळाला आहे. न्यायालयाने सर्व १२ प्रकरणांत १ लाख पाकिस्तानी रुपयांच्या बॉंडवर जामीन दिला आहे.

पीपीपी-पीएमएल-एन आघाडी शक्य

पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (पीएमएलएन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी हे केंद्रात आणि पंजाबमध्ये आघाडी सरकार स्थापन करण्यात सहमत झाल्याचे वृत्त आहे. बिलावल भुट्टो- असिफ अली झरदारी यांची भेट घेतल्याचे शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

शहाबाज शरीफ यांनी पंजाबचे काळजीवाहू मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांच्या निवासस्थानी ‘पीपीपी’च्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. यावेळी सरकार स्थापनेवर चर्चा करण्यात आली. दोन्ही पक्षाकडून आणखी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून त्यात आगामी रणनितीचा मुद्दा मांडला जाणार आहे. तब्बल पाऊण तास बैठक चालल्याचे सूत्राने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Parenting Tips: पालकांच्या 'या' चांगल्या सवयींमुळे मुले होतात शिस्तबद्ध, तुम्हीही करू शकता फॉलो

Mumbai High Court : १८ वर्षाखालील पत्नीशी संबंधही बलात्काराच, उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Mumbai: काँग्रेसचा 'मुंबईनामा' अदानींना धक्का? पोस्टरवर सोनिया गांधींच्या जागी बाळासाहेबांचा मोठा फोटो, काय आहे जाहीरनाम्यात ?

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

SCROLL FOR NEXT