Pakistan Election 
ग्लोबल

Pakistan Election: 42 अब्ज रुपये खर्च... कोणीही जिंकेले तरी या निवडणुकीत होईल पाकिस्तानचा सत्यानाश?

Pakistan Election: पाकिस्तानची परिस्थिती सध्या वाईट आहे. आर्थिकबाबतीत पाकिस्तान तर खूप गरीब झाला आहे. असे असतानाही पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीवर सर्वाधिक खर्च झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.

Sandip Kapde

Pakistan Election: पाकिस्तानची परिस्थिती सध्या वाईट आहे. आर्थिकबाबतीत पाकिस्तान तर खूप गरीब झाला आहे. असे असतानाही पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीवर सर्वाधिक खर्च झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पाकिस्तानने सामान्य नागरिकांवर वीज आणि इतर प्रकारचे कर लादून सार्वत्रिक निवडणुका घेतल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम जनतेवर झाला आहे. पाकिस्तानला आयएमएफकडून कर्ज मिळाले असले तरी, या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर खर्च केल्याने देशावरील आर्थिक दबाव वाढेल, ज्यातून बाहेर पडणे सोपे नाही.


पाकिस्तानची वाटचाल विनाशाकडे सुरु आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. पाकिस्तान निवडणूक आयोगाने नुकतीच सर्वात्रिक निवडणुकांची आकडेवारी जाहीर केली. पाकिस्तानला सार्वत्रिक निवडणूक 2024 ही इतिहासातील सर्वात महागडी निवडणूक ठरणार आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाचा सांगितले की 42 अब्ज रुपये खर्च होण्याची अपेक्षा आहे. ही आकडेवारी गेल्या निवडणुकीपेक्षा २६ टक्के जास्त आहे.

पाकिस्तानी न्यूज चॅनल एआरवायच्या म्हणण्यानुसार, जर सुरक्षा आणि इतर व्यवस्थांचा समावेश असेल तर एकूण खर्चाचा अंदाज 49 अब्ज रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. आज (शुक्रवार) 8 फेब्रुवारीपासून सार्वत्रिक निवडणुकांना सुरुवात झाली आणि आज त्याचे निकाल येत आहेत.

सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रारंभिक बजेट 42 अब्ज रुपये ठेवण्यात आले होते, जे 2018 च्या निवडणुकीपेक्षा 26 टक्के अधिक आहे.  निवडणुकीच्या अर्थसंकल्पातील बहुतांश खर्च मतपत्रिकांची छपाई, सुरक्षेसाठी एजन्सी तैनात करणे आणि मतदान कर्मचाऱ्यांचे पेमेंट यावर खर्च करण्यात आला आहे.

पाकिस्तानमध्ये निवडणुकीसाठी पाकिस्तानने IMF कडून फक्त 3 अब्ज डॉलर्सचे कर्ज मागितले आहे, त्यापैकी 1.9 अब्ज डॉलर्स मिळाले आहेत आणि 1.2 अब्ज डॉलर बाकी आहेत. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या मते, 30 जून 2023 पर्यंत पाकिस्तानचे कर्ज आणि दायित्वे 56.21 लाख कोटी रुपये होती, त्यानंतर IMF ने 700 दशलक्ष डॉलर कर्ज दिले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT