Pakistan Bankruptcy  Esakal
ग्लोबल

Pakistan Bankruptcy:पाकिस्तानची ऋण काढून सण करायची सवय जाता जाईना, कर्जाच्या पैशाने फडकवणार आशिया खंडातील सर्वात उंच झेंडा

Pakistan Tallest Flag Hoisting: पाकिस्तान सरकार ४० कोटी रुपये खर्च करुन, आशिया खंडातील सर्वात उंच झेंडा फडकवणार.

सकाळ डिजिटल टीम

Pakistan on the threshold of Bankruptcy: पाकिस्तान देशाची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. पंजाब प्रांताच्या शासनाने १४ ऑगस्टला देशाच्या ७६व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ५०० फूटाच्या ध्वज स्तंभावर आपला झेंडा फडकवण्याची घोषणा केली.

यासाठी एकूण ४० कोटी पाकिस्तानी रुपयांचा खर्च लागणार आहे. पाकिस्तानने ही घोषणा तेव्हा केली, जेव्हा देशाला आपली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून बेलआऊट पॅकेज मिळालं घोषित.

आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असलेला पाकिस्तान लाहोर चौकातील लिबर्टी चौकात हा झेंडा फडकवणार आहे. सहा वर्षांआधी म्हणजेचं २०१७मध्ये पाकिस्तानने अटारी-वाघा बॉर्डरवर आशिया खंडातील सर्वात उंच झेंडा फडकवला होता.(Latest Marathi News)

१२०X 80 फूटाचा झेंडा पाकिस्तानच्या सात दशकाच्या इतिहासाती सर्वात उंच झेंडा होता.

पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून हा निर्णय आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेकडून ३ अरब डॉलरचे बेलआऊट पॅकेज मंजूर झाल्यानंतर काही दिवसांनंतर आला. पाकिस्तानमध्ये आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी ही रक्कम ९ महिन्यांमध्ये त्यांना मिळेल.(Latest Marathi News)

मात्र, ज्या प्रांतामध्ये हा झेंडा फडकवला जाणार आहे. त्या प्रातांला आपले परदेशी कर्ज परत करण्यासाठी कमीत कमी २००० कोटी रुपयांची गरज आहे.

याआधी १२ जुलैला पाकिस्तानला आपल्या गरजेसाठी संयुक्त अरब अमिरात या देशाकडून १ बिलियन डॉलर मिळाले होते. त्याच्या एका दिवसानंतर सौदी अरेबियाने देशातील केंद्रीय बॅंकांना २ मिलियन डॉलर ट्रान्सफर केले होते.(Latest Marathi News)

पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या डबघाईला आलेली आहे. देशाला मागच्या वर्षी मोठा धक्का बसला होता. पाकिस्तानमध्ये आलेल्या पूरामुळे १७३९ लोकांचा मृत्यू झाला होता. २० लाख घरं नष्ट झाली होते आणि देशाला ३० अरब डॉलरचे नुकसान झाले होते.

बेल-आऊट पॅकेज म्हणजे नेमकं काय?

एखादी कंपनी किंवा देश जेव्हा आर्थिक दिवाळखोरीच्या मार्गावर असतो, तेव्हा त्या देशाला अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी दुसऱ्या देशाकडून आर्थिक मदत केली जाते. या आर्थिक मदतीला बेल-आऊट पॅकेज म्हटलं जातं.

मात्र, देशाच्या स्वातंत्र्यदिनी देश कर्जात बुडालेला असताना अनावश्यक ठिकाणी खर्च केला गेला, तर देश आर्थिक संकटातून कधीही बाहेर येऊ शकत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: विधानसभा निवडणुकीत दुबईत आला पैसा, क्रिप्टोकरन्सीद्वारे बेकायदा फंडिंग; भाजपचा मविआवर खळबळजनक आरोप

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र नोंदवेल का ६५ टक्के मतदान? दहा वर्षांपासून ६० टक्केच नोंद

Women’s Asian Champions Trophy: भारतीय संघाची पाचव्यांदा फायनलमध्ये धडक; जपानला सेमीफायनलमध्ये केलं पराभूत

Hitendra Thakur: एका मताच्या जोरावर विलासराव देशमुखांचं सरकार तारणारे हितेंद्र ठाकूर; बदल्यात काय घेतलं होतं?

Anil Deshmukh : तुम्ही दगड मारा किंवा गोळ्या झाडा, अनिल देशमुख मरणार नाही, आणि तुम्हाला सोडणारही नाही

SCROLL FOR NEXT