ग्लोबल

कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकील नियुक्त करा; पाकने भारताला सुनावलं

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद: पाकिस्तानमधील इस्लामाबादच्या हायकोर्टाने काल गुरुवारी भारताला कुलभूषण जाधव यांच्यासाठी 13 एप्रिलपर्यंत वकील नियुक्त करण्यासाठी सांगितलं आहे. यानंतर पाकिस्तानकडून जाधव यांना दिली गेलेली मृत्यूच्या शिक्षेवर पुन्हा एकदा चर्चा करण्यात येईल. भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना एप्रिल 2017 मध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली पाकिस्तानी सैन्याच्या कोर्टाने मृत्यूची शिक्षा सुनावली होती. (Kulbhushan Jadhav)

भारताने या शिक्षेला आव्हान देण्यासाठी पाकिस्तानविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायलयाचा दरवाजा ठोठावला होता. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर हेगमधील कोर्टाने जुलै 2019 मध्ये असा निर्णय दिला होता की, पाकिस्तानने जाधव यांना भारताच्या काऊन्सिलरसाठी परवानगी द्यावी आणि त्यांना दिलेल्या या मृत्यूच्या शिक्षेवर पुनर्विचार करावा.

इस्लामाबाद हायकोर्टाने ऑगस्ट 2020 मध्ये मुख्य न्यायाधीश अतहर मिनल्लाह, न्यायमूर्ती अमीर फारुक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांच्या तीन सदस्यीय पीठाची नियुक्ती केलील होती. त्यांनी वारंवार भारताला जाधव यांच्यासाठी पाकिस्तानमधून एक वकिल नियुक्त करण्यास सांगितलं होतं. मात्र, भारताने वारंवार भारतीय वकीलांची नियुक्ती करण्याची संधी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

पाकिस्तानचे अटॉर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी भारतीय पक्षाची बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने गुरुवारी भारताला जाधव यांच्यासाठी 13 एप्रिलपर्यंत वकील नियुक्त करण्यास सांगितलं आहे. तसेच खान यांनी कोर्टाला म्हटलं होतं की, भारत जाणीवपूर्वक या प्रकरणी उशीर करत आहे. जेणेकरुन त्यांना पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये धाव घेता येईल आणि पाकिस्तानविरोधात तक्रार करण्याची खोड काढता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahavikas Aghadi advertisement: महाविकास आघाडीच्या जाहिरातीवर ब्राम्हण समाजाचा तीव्र आक्षेप; बंदी आणण्याची मागणी

'बिग बॉस १८' मध्ये सलमानने घेतली अश्नीर ग्रोवरची शाळा; दोगलापन वाल्या डायलॉगवर भाईजान नाराज

Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ

Nepal Tourist Places: नेपाळमधील 'ही' पाच ठिकाणे आहेत नयनरम्य, अनेक पर्यटकांनाही नसेल माहिती

Google Spam Detection Tool : ट्रूकॉलरला टक्कर द्यायला गुगलने आणलं नवं फीचर, तुमच्या फोनमध्ये कसं वापराल? वाचा

SCROLL FOR NEXT