Pakistan Minister Video eSakal
ग्लोबल

Pakistan Minister Video : पाकिस्तान ड्रोनमार्फत पंजाबमध्ये पाठवतंय ड्रग्स; पंतप्रधान शरीफ यांच्या जवळच्या नेत्याने दिली कबूली!

Drug Peddling with Drone : मलिक मोहम्मद अहमद खान हे शरीफ यांचे सल्लागार आहेत.

Sudesh

पंजाबमध्ये ड्रग्सचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. यासाठी पाकिस्तानकडून ड्रग्स पुरवठा होत असल्याचे आरोप कित्येक दिवसांपासून होत आहेत. आता पाकिस्तान सरकारमधील एका उच्चपदस्थ नेत्यानेच याची कबूली दिली आहे. विशेष म्हणजे हा नेता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे.

मलिक मोहम्मद अहमद खान असं या नेत्याचं नाव आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे विशेष सुरक्षा सहाय्यक म्हणून ते काम करतात. पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर यांना दिलेल्या एका मुलाखतीत खान यांनी पाकिस्तान पंजाबमध्ये ड्रोनच्या माध्यमातून ड्रग्स पाठवत असल्याचं मान्य केलं. पाकिस्तानातील एखाद्या नेत्याने अशा प्रकारची कबूली देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

खान हे विधानसभा सदस्य (एमपीए) देखील आहेत. हामीद मीर यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरुन या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये पत्रकार हामीद मीर हे खान यांना कसूर प्रांतातील सीमेवरून ड्रोनच्या माध्यमातून भारतात होत असलेल्या अमली पदार्थांच्या तस्करीबाबत प्रश्न विचारतात. (Pakistan Minister on Drug Peddling)

यावर उत्तर देताना खान म्हणतात, "हो. हे खूपच गंभीर आहे. अशा दोन घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. यात प्रत्येक ड्रोनला १० किलो हेरॉईन बांधून सीमेपलीकडे पाठवण्यात आलं होतं. सुरक्षा एजन्सी हे प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत."

मीर यांनी आपल्या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, की 'पंतप्रधानांचे सल्लागार मलिक मोहम्मद अहमद खान यांचा मोठा खुलासा. कसूर प्रांतात भारत-पाकिस्तान सीमेवरुन हेरॉईनच्या तस्करीसाठी ड्रोनचा वापर होतो आहे. यासोबतच, त्यांनी पूरग्रसांच्या पुनर्वसनासाठी सरकारने पॅकेज द्यावं अशी मागणी केली, अन्यथा हे नागरिक तस्करांना सामील होतील.'

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमध्ये सर्वाधिक ड्रग्स हे पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधून जप्त करण्यात आलं आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून केवळ ड्रग्सच नाही, तर हत्यारांची तस्करीदेखील होते आहे. पंजाबच्या सीमा भागातून यावर्षी आतापर्यंत २६० किलो हेरॉईन, १९ हत्यारं, ३० मॅगझीन, ४७० राउंड दारुगोळा आणि ३० पाकिस्तानी ड्रोन जप्त करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT