crime update mob attack Youth  Sakal
ग्लोबल

Pakistan Mob Lynching: पाकिस्तानात पर्यटकाला जिवंत जाळलं! महिन्याभरात ईशनिंदेची घडली दुसरी घटना

वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील निसर्गरम्य स्वात जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पेशावर : वायव्य पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथील निसर्गरम्य स्वात जिल्ह्यात कुराणची विटंबना केल्याप्रकरणी संतप्त जमावानं एका व्यक्तीची हत्या केली आणि त्यानंतर त्याला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर झालेल्या वादात आठ जण जखमी झाले आहेत. (Pakistan Mob Lynching tourist was burned alive this is second incident of blasphemy in month)

स्वातचे जिल्हा पोलीस अधिकारी (डीपीओ), झाहिदुल्ला यांनी सांगितलं की, पंजाबच्या सियालकोट जिल्ह्यातील एका व्यक्तीनं गुरुवारी रात्री पवित्र कुराणची काही पानं जाळली. या घटनेनंतर संशयीताला लोकांनी पोलीस ठाण्यात आणलं. यानंतर पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमा झाला आणि त्याला ताब्यात देण्याची मागणी केली.

पोलिसांनी त्यास नकार दिल्यानंतर जमावानं गोळीबार केला, पोलिसांनीही याला प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला मद्यान रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यानंतर संतप्त जमावानं पोलीस ठाणे पेटवून दिलं. नंतर काही लोक पोलीस ठाण्यात घुसले, त्यांनी संशयिताला गोळ्या घातल्या आणि बाहेर ओढत आणून पेटवून दिलं.

या घटनेमुळं निर्माण झालेल्या गोंधळात आठ जण जखमी झाले आहेत. मद्यानमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.

जमावाने हत्या केल्याची दुसरी घटना

कुराणची विटंबना केल्याच्या आरोपावरून कट्टरपंथी इस्लामवाद्यांच्या जमावानं पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एका ख्रिश्चन व्यक्तीवर हल्ला केला होता. लाहोरपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या पंजाबमधील मुजाहिद कॉलनी सरगोधा जिल्ह्यात ही घटना घडली होती. यानंतर ख्रिश्चन समुदायाच्या मालमत्तेवर जमावानं हल्ला केल्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर फिरत आहेत. पाकिस्तानातील कट्टरपंथी तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar NCP Second List: अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर! सात नव्या उमेदवारांची घोषणा, वडगाव शेरीचंही ठरलं

शाहरुखच्या 'चक दे इंडिया'च्या बदललेल्या कथेवर अन्नू कपूर संतापले; म्हणाले- मुस्लिम चांगला दाखवून पंडितांची थट्टा...

Share Market Opening: शेअर बाजारात घसरण सुरुच; निफ्टी 24,400च्या खाली, कोणते शेअर्स कोसळले?

Share Market Today: आज कोणते शेअर्स असतील तेजीत? जागतिक बाजारात काय आहेत संकेत?

Ajit Pawar NCP: अजित पवार यांचा धडाका! काँग्रेससह भाजपलाही दिला धक्का; दोन माजी खासदारांसह आमदार राष्ट्रवादीत

SCROLL FOR NEXT