इस्लामाबाद: पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स विमानाच्या ढिगाऱयाखाली कोट्यवधी रुपयांची रोकड सापडल्यामुळे खळबळ उडाली असून, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे चव्हाट्यावर आले आहेत.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्सचे विमान लाहोरवरून कराचीकडे निघाले होते. मात्र, उड्डानानंतर काही वेळातच विमानाला शुक्रवारी (ता. 22) अपघात झाला होता. विमानतळाजवळ असणाऱ्या रहिवाशी भागात विमान कोसळले. यावेळी झालेल्या अपघातात 97 जणांचा मृत्यू झाला होता, दोन जण बचावले होते. अपघातानंतर सुरक्षा दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह बाहेर काढताना विमानाच्या ढिगाऱ्यात तब्बल तीन कोटी रुपयांची सापडली. या रक्कमेमध्ये विविध देशांच्या चलनी नोटा आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली.
दरम्यान, विमानाच्या ढिगाऱयाखाली एवढी मोठी रक्कम आढळल्यानंतर विविध प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 47 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून 43 मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहे. विमान रनवेपासून फक्त एक किलोमीटर दूर असताना हा अपघात झाला. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. याच परिसरातील एका इमारतीवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये विमान कोसळतानाचे दृष्य कैद झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.