Pakistan esakal
ग्लोबल

Pakistan: अमानुष पाकिस्तान! कैद्यांचा छळ, सहा जणांचा मृत्यु

पाकिस्तानचं भारतासोबतचं वागणं हे नेहमीच संशयास्पद राहिलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

India Vs Pakistan News: पाकिस्तान हा किती घृणास्पद कृत्य करु शकतो याचा प्रत्यय पुन्हा एकदा दिसून आला आहे. भारतीय कैद्यांबाबत या देशाची भूमिका नेहमीच नकारात्मक राहिली आहे. मानवतेच्या नव्हे तर हिंसकवृत्तीनं विचार करुन त्याला उत्तर देण्याचे काम पाकिस्ताननं केलं आहे. आताही त्यांनी भारतीय कैद्यांबाबत जे काही केले आहे त्यानं खळबळ उडवून दिली आहे. यापूर्वी देखील पाकिस्ताननं भारताच्या सैन्यासोबत केलेल्या हिंसक कृत्याचा मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त करण्यात आला होता.

पाकिस्तानचं भारतासोबतचं वागणं हे नेहमीच संशयास्पद राहिलं आहे. त्यामुळे त्या देशावर कितपत विश्वास ठेवायचा असा प्रश्न राज्यकर्ते, धोरणकर्ते यांना पडला आहे. भारतीय सैन्याच्या काही सैनिकांना कैदी म्हणून पाकिस्तानमध्ये जी वागणूक दिली जात आहे त्यात त्यांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या नऊ महिन्यात सहा कैद्यांचा या छळवणूकीत मृत्यु झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचे तीव्र पडसाद आता सोशल मीडियावर उमटले आहेत.

मोठ्या प्रमाणावर भारतीय सैनिक हे पाकिस्तानातील जेलमध्ये बंदिस्त आहे. त्यांचा मृत्यु कसा झाला याचा अंदाज वर्तवणं कठीण असलं तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या सैनिकांचा अमानुष छळ झाल्याचे सांगण्यात आले आहे. आता ज्या कैद्यांचा जेलमध्ये मृत्यु झाला ते भारतीय मच्छिमार असल्याची माहिती आहे. मासेमारीसाठी खोल समुद्रात गेल्यानंतर दिशा भरकटल्यानं पाकिस्तानी सीमा ओलांडलेल्या त्या व्यक्तींना पाकिस्तानी सैनिकांनी अटक केली होती.

यापूर्वी देखील पाकिस्तानमध्ये जे बंदिस्त कैदी आहेत त्यांना सोडविण्यासाठी भारतानं पुढाकार घेणे जरुरीचे आहे. मात्र त्यावर अद्याप ठोस धोरणात्मक निर्णय झाला नसल्याचे दिसून आले आहे. याविषयी अधिक माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अरिंदम बागची म्हणाले की, गेल्या सहा महिन्यात पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या सहा भारतीय व्यक्तींचा मृत्यु झाला आहे. त्यात पाच मच्छिमार होते. त्या सहा जणांनी आपली शिक्षा पूर्ण केली होती. त्यांनी आपल्याला मायदेशी जाऊ द्यावे अशी विनंतीही केली होती. मात्र पाकिस्ताननं ती मागणी फेटाळून लावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge Video : प्रियंका गांधी अर्ज दाखल करताना खर्गे दाराबाहेर उभे? दलितांचा अपमान झाल्याचा भाजपचा आरोप

Samsung Galaxy Smart Ring : सॅमसंग गॅलेक्सी रिंग झाली लाँच; फॅशन-तंत्रज्ञानाचा अनोखा संगम,किंमत अन् फीचर्स पाहा

Latest Maharashtra News Updates : Canada Politics Live: सुप्रिया सुळेंनी केलं हर्षवर्धन पाटलांचं औक्षण

Kalyan Gramin Assembly Constituency: मनसेचे राजू पाटील वाचवणार का आपली जागा? की उद्धव ठाकरे देणार धक्का?

Kolhapur Politics : कोल्हापूर शहराचे पहिले आमदार कोण? 'या' चिन्हावर मिळवला होता विजय, अनेक संकटांवर केली होती मात

SCROLL FOR NEXT