Imran Khan esakal
ग्लोबल

Imran Khan News : इम्रान खान यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा! एका तासात हजर करण्याचे दिले निर्देश

रोहित कणसे

पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने इम्रान खान यांची अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. इम्रान खान यांच्या अटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं असून यावर आज कोर्ट निर्णय देणार आहे. कोर्टाने इम्रान खान यांनी एका तासाच्या आत कोर्टात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच कोर्टाने भविष्यातील घटनांसाठी आदर्श ठरण्याची ही वेळ असल्याचे देखील म्हटले आहे. पाकिस्तानला कारागृह बनू देणार नाहीत. तपास यंत्रणा एनएबीने देशाचे खूप नुकसान केले आहे अशी टिप्पणी देखील कोर्टाने केली आहे.

इम्रान खान यांनी त्यांच्या अटकेविरोधात इस्लामाबाद हायकोर्टाच्या आदेशाविरोधात पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात दाद मागीतली होती. पीटीआय ने इम्रान खान यांच्या इम्रान खान यांच्या अटकेला वैध ठरवणाऱ्या इस्लामाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द करण्यासाठी याचिका केली आहे. या याचिकेत म्हटले आहे की हा आदेश संविधानाच्या अनुच्छेज १० ए च्या विरोधात आहे, तसेच हायकोर्टाचा निर्णय़ विरोधाभासांनी भरलेला असल्याचे देखील म्हटले आहे.

इम्रान खान यांना अटक का झाली?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना अल कादिर ट्रस्ट प्रकरणात मंगळवारी अटक झाली होती.त्यांना नॅशनल अकाउंटेबिलीटी ब्यूरो आणि पाक रेंजर्सनी इस्लामाबाद हायकोर्टाच्या बाहेरून अटक केली होती.

पाकिस्तान पेटला

यानंतर पाकिस्तानात गदारोळ माजला होता. लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी या अटकेविरोधात आंदोलन केले. पीटीआय समर्थकांनी पाकिस्तानी सेनेवर देखील हल्ले करण्यास सुरूवात केली. आंदोलकांनी सैन्याच्या इमारती आणि कार्यालयांवर मोठ्या संख्येने हल्ले केले.

पोलीसांनी दिलेल्या मागितीनुसार आंदोलकांनी मागील काही दिवसात १४ सरकारी इमारती, २१ पोलीस वाहने जाळून टाकली आहेत. यावेळी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू झाला आहे तर ३०० लोक जखमी झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Latest Marathi News Updates live : लाडक्या बहिणींना आता महिन्याला 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT