Pakistan Tehreek-e-Insaf leader Imran Khan acquitted by Islamabad High Court in three cases Sakal
ग्लोबल

Imran Khan : पाकिस्तान माजी पंतप्रधान इम्रान यांची तीन गुन्ह्यांतून मुक्तता

इम्रान खान हे ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. एप्रिल २०२२ मध्ये सत्ता गेल्यापासून त्यांच्याविरोधात सुमारे २०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामाबाद : पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे नेते इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने तीन प्रकरणांत निर्दोष ठरविले. गोपनीय कागदपत्रे उघड केल्याच्या प्रकरणाचाही यात समावेश आहे. याच प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने इम्रान यांना दोषी ठरवत १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

इम्रान खान हे ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. एप्रिल २०२२ मध्ये सत्ता गेल्यापासून त्यांच्याविरोधात सुमारे २०० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पंतप्रधानपदावर असताना गोपनीय राजनैतिक कागदपत्रांतील माहिती उघड करत त्याचा वापर राजकीय कारणांसाठी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

याप्रकरणी इम्रान यांचे पक्ष सहकारी आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना देखील कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरविले होते. या शिक्षेविरोधात दोघांनी उच्च न्यायालयात अपील केले होते.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी घेत इम्रान खान आणि कुरेशी यांची निर्दोष मुक्तता केली. गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपांतून मुक्तता झाली असली तरी इम्रान खान आणि कुरेशी यांचा मुक्काम तुरुंगातच राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT