सिंध प्रांतातील शिकारपूर शहरात राहणारी सना यापूर्वी तिच्या पालकांच्या सांगण्यावरून डॉक्टर बनली होती.
पाकिस्तानमधील हिंदू (Hindu) अल्पसंख्याकांना अनेकदा त्रास दिल्याच्या बातम्या समोर येतात. परंतु, अलीकडंच पाकिस्तानमधून सकारात्मक बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.
इथं एका 27 वर्षीय हिंदू मुलीनं (Hindu Girl) पाकिस्तानमधील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण केलीये. आता ती पाकिस्तानची (Pakistan) प्रशासक म्हणून काम करणार आहे.
पाकिस्तानात स्वातंत्र्य मिळाल्यापासून एकाही हिंदू महिलेनं ही परीक्षा उत्तीर्ण केली नव्हती. व्यवसायानं डॉक्टर असलेल्या सना रामचंद गुलवानीनं (Sana Ramchand Gulwani) ही परीक्षा उत्तीर्ण केलीये.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील सनानं केंद्रीय सुपीरियर सर्व्हिसेस (Central Superior Services CSS) परीक्षा 2020 मध्ये यश मिळविलंय. डॉनच्या वृत्तानुसार, सना अटॉक जिल्ह्यातील हसन अब्दालमध्ये सहाय्यक आयुक्त आणि प्रशासक म्हणून रुजू झालीये. या परीक्षेत ती पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली. फाळणीनंतर अल्पसंख्याक समाजातील मुलगी परीक्षेत उत्तीर्ण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
सिंध प्रांतातील शिकारपूर शहरात राहणारी सना यापूर्वी तिच्या पालकांच्या सांगण्यावरून डॉक्टर बनली होती. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेली सना म्हणते, 'ही परीक्षा उत्तीर्ण होणारी ती तिच्या समाजातील पहिली मुलगी आहे.' सनानं बेनझीर भुट्टो मेडिकल युनिव्हर्सिटीमधून एमबीबीएस केलंय. यानंतर तिनं पुढील शिक्षण सुरू ठेवलं. ती यूरोलॉजिस्ट देखील आहे. यानंतर तिची संघ लोकसेवा आयोगात निवड झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.