Ayesha Death News Esakal
ग्लोबल

Ayesha Death News : 'मेरा दिल ये पुकारे' गाण्यानं व्हायरल झालेल्या पाकिस्तानच्या आयेशाचा झाला मृत्यू?

जाणून घ्या काय आहे सत्य

अंकिता खाणे (Ankita Khane)

काही दिवसांपूर्वी भारतात एका पाकिस्तानी मुलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. आयशा मानो असे या मुलीचे नाव असून ती एका लग्नात 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर डान्स करताना दिसली होती. आता आयशा मानोबद्दल अनेक बातम्या पसरल्या आहेत. आयशा मानोचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला असल्याच्या बातम्या सध्या व्हायरल झाल्या आहेत.(Latest Marathi News)

आयेशाचा मृत्यू झाला असल्याची बातमी खरी आहे. पण ती आयशा व्हायरल पाकिस्तानी गर्ल आयशा मानो नसून आयशा हनीफ आहे. दोघीही टिक टॉकर आहेत. पण एकाच नावामुळे अनेक ठिकाणी आयेशा मानोच्या मृत्यूच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. याशिवाय लोक आयशा मानोचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिला श्रद्धांजली वाहत आहेत.(Latest Marathi News)

एकीकडे आयशाच्या मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. तर, दुसरीकडे आयशा पाकिस्तानींना ऑनलाइन कमाईची कल्पना देत आहे. आयशाने मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता तिच्या अकाऊंटवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही मिनिटांतच आयशाच्या व्हिडिओला सुमारे दोन हजार लाईक्स आले आहेत.(Latest Marathi News)

कोण आहे आयेशा हनिफ आणि तिचा मृत्यू कसा झाला

पाकिस्तानी न्यूज वेबसाइट एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, शनिवारी सकाळी जिना मेडिकल सेंटरमध्ये एका महिला टिकटॉकरचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी आयेशा हनिफचा पती मोहम्मद आदिल आणि सासू नुसरत सोबिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.(Latest Marathi News)

आयशा एका प्रायव्हेट पार्टीला गेली होती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा हनीफ डीएचए फेज 1 मधील एका घरात एका खाजगी पार्टीत गेली होती. त्या घराचा मालक अद्याप पुढे आलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी आयेशाची सासू नुसरत सोबिया यांचे जबाब घेतले होते. तिने सांगितले की, ती गेल्या 16 वर्षांपासून कराचीच्या गुलिस्तान-ए-जौहर भागात भाड्याच्या घरात राहत होती. पण ती काही दिवस गुजरातमध्ये होती आणि जेव्हा तिला आपल्या सुनेच्या मृत्यूची बातमी समजली तेव्हा ती लगेच कराचीला आली.(Latest Marathi News)

आयशा हनिफ आणि आदिल यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. असे सांगितले जात आहे की आयशाने बळजबरीने किंवा स्वतःच्या इच्छेने ड्रग्सचा ओव्हरडोज घेतला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT