Penguin Study esakal
ग्लोबल

पेंग्विन, पर्यावरण बदल समजून घेण्यासाठी कशी मदत करतो?

शास्त्रज्ञ पेंग्विनचा वापर दक्षिण ध्रुवाजवळील हवामान बदल समजून घेण्यासाठी करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पेंग्विन आता हवामान बदल समजून घेण्यासाठी नवीन बायोइंडिकेटर बनले आहेत. गेल्या काही वर्षांपासून, शास्त्रज्ञ अंटार्क्टिकामधील पेंग्विनचा (penguins)अभ्यास (Study) करत आहेत. तसेच ग्लोबल वॉर्मिंगचा (Global Warming) परिणाम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ध्रुवीय पर्यावरणशास्त्र संशोधक मायकेल वेथिंग्टन आणि अॅलेक्स बोरोविझ अंटार्क्टिकाच्या अँडरसन बेटावर संशोधन करत आहेत. त्यातून या पेंग्विनच्या वसाहतीचे संकेत मिळत आहेत.

पृथ्वीच्या दक्षिण भागात गोठलेल्या जागेचे हे पक्षी प्रतिक आहेत. म्हणूनच शास्त्रज्ञ आता त्यांचा वापर दक्षिण ध्रुवाजवळील हवामान बदल समजून घेण्यासाठी मुख्य मार्गदर्शक म्हणून करत आहेत. अंटार्क्टिक द्वीपकल्पासारख्या काही पश्चिमेकडील प्रदेशांमध्ये तापमानवाढ वेगाने होते आहे. तर, पूर्व अंटार्क्टिका थंड आणि बर्फाने झाकलेले आहेत. या विषयी न्यूयॉर्कमधील स्टोनी ब्रूक युनिव्हर्सिटीचे बोरोविझ (Borowicz) यांनी सांगितले की, एका कॉलनीमध्ये किती पेंग्विन आहेत? दरवर्षी ते किती पिल्लांना जन्म देतात? ती संख्या पर्यावरणीय परिस्थितीनुसार वाढते आहे की नाही हे समजून घेण्यासाठी आम्ही पेंग्विनची घरटी मोजत आहोत. हवामान संशोधकांसाठी अंटार्टिकाच्या दुर्गम- बर्फाळ भागात काम करणे सोपे नाही. पण, इतर प्राणी किंवा प्रजातींपेक्षा पेंग्विनचा मागोवा घेणे, त्यांना शोधणे सोपे आहे. कारण ते जमिनीवर घरटे करतात. त्यांचे काळे पंख, त्यांनी केलेला कचरा पसरलेला दिसतो.

penguins

एकूण इकोसिस्टीम कशी कार्यरत आहे ते बघण्यासाठी आम्ही पेंग्विनचा बायोइंडिकेटर म्हणून वापर करू शकतो, असे संशोधक वेथिंग्टन म्हणाले. उपग्रहावरील प्रतिमांचे विश्लेषण तसेच इतर पद्धतींसह पेंग्विनची संख्या त्यांचे गणित सांगते. काही पेंग्विनना डब केले जाते. त्यांच्यातून जसे हवामान बदल, नवीन अधिवास यांची माहिती तर कळतेच. तर इतरांकडून थंड हवामानाची माहिती कळते. 2020 मध्ये, ब्रिटीश अंटार्क्टिक सर्वेक्षणाच्या एका टीमने सॅटेलाइट इमेजमधून 11 नवीन पेंग्विन्सच्या वसाहती शोधल्या. त्यातून पेंग्विन वसाहती 20 टक्क्यांनी वाढल्याचे लक्षात आले.

जेंटू पेंग्विनचाही अभ्यास

लाल-केशरी चोच आणि डोक्यावर विशिष्ट पांढर्‍या खुणा असलेले जेंटू पेंग्विनचाही अभ्यास केला जात आहे. 20 व्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा अंटार्क्टिक द्वीपकल्पावरील तापमान जगापेक्षा वेगाने वाढू लागले, तेव्हा जेंटू दक्षिणेकडे सरकले ज्याला काही शास्त्रज्ञ अंटार्क्टिकाचे 'जेंटोफिकेशन' म्हणतात. जेंटू पेंग्विनला समुद्राचा बर्फ आवडत नाही. डेव्हिड आयनले, पर्यावरणविषयक सल्लागार तसेच पेंग्विनचा ५० वर्षांहून अधिक काळ अभ्यास करणारे जीवशास्त्रज्ञ म्हणाले की, द्वीपकल्पाच्या पश्चिमेकडील समुद्रातील बर्फ कमी झाल्यामुळे, जेंटूंनी या परिस्थितीचा फायदा घेतला आहे. प्रजनन आणि खाण्यासाठी त्यांना समुद्राच्या बर्फावर अवलंबून राहवे लागते. तसेच जेव्हा अॅडेली पेंग्विन सापडतात, तेव्हा समुद्राचा बर्फ जवळ आहे हे समजजे. असे वेथिंग्टन यांनी सांगितले. तसेच जेव्हा आम्ही समुद्रातील बर्फ कमी होताना किंवा पूर्णपणे नाहीसा होताना दिसतो, तेव्हा या अॅडेली पेंग्विन लोकसंख्येमध्ये लक्षणीय घट झाल्याचे लक्षात येते. अॅडेली पेंग्विनची संख्या एकंदरीत वाढत असली तरी ती 65 टक्क्यांहून कमी झाल्याचे ते म्हणाले. एकूणच पर्यावरण बदलासाठी जी मदत पेंग्विन करतो त्यावर अधिक संशोधन सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT