Philippines AFP News
ग्लोबल

फिलिपाइन्समध्ये विध्वंस! चक्रीवादळात 75 जणांचा मृत्यू, लाखो बेघर

Philippines Typhoon : अनेक भागात दळणवळण आणि वीज पुरवठा खंडीत झाला आहे.

सुधीर काकडे

फिलिपाइन्समध्ये (Philippines) चक्रीवादळामुळे (Cyclone) हाहाकार माजला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार रविवारपर्यंत, वादळामुळे सुमारे 75 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्या ठिकाणी मोठा विध्वंस झाला तिथे लोकांना पाणी आणि अन्न पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 'राई' चक्रीवादळामुळे 300,000पेक्षा जास्त लोकांना त्यांची घरं आणि बीच रिसॉर्ट सोडावे लागलेले आहेत. अनेक भागात दळणवळण आणि वीज सेवा विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि घरांची छत कोसळल्याने गावांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

वेगवेगळ्या शहरांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार नुकताच 49 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण आकडा 75 वर पोहोचला आहे. त्याचबरोबर 13 जण जखमी झाल्याची माहिती आहे तर 10 जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा देखील शोध सुरू असल्याचं बोहोलचे गव्हर्नर आर्थर याप यांनी सांगितलं आहे.

गुरुवारी वादळाचा वेग ताशी १९५ किलोमीटर होता. दळणवळण सेवा पूर्णपणे ठप्प झालेली असून, बचावकार्य सुरू आहे. नागरिकांना उंच ठिकाणी हालवलं जात आहे. सैन्याचे आणि पोलीस दलाचे हजारो जवान बचावकार्यात सहभागी झालेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT