USA Indian Embassy  Esakal
ग्लोबल

वॉशिंग्टनमध्ये भारतीय दूतावासाबाहेर आंदोलन करण्याचा खलिस्तानी समर्थकांचा डाव, दूतावासाबाहेर कडक सुरक्षा

यापूर्वीही भारतीय दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता.

सकाळ डिजिटल टीम

Indian Embassy in USA:वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाच्या बाहेर खलिस्तान समर्थक निदर्शने करण्याची योजना उघड झाली आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील भारतीय दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. भारत नेहमीच अशा घटनांचा निषेध करत आलाय आणि संबंधित सरकारने या गैरकृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी 4 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील वाणिज्य दूतावास खलिस्तान समर्थकांनी पेटवून दिला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली आणि कोणतीही जीवितहानी झाली नाही. खलिस्तानी कट्टरवाद्यांनी या घटनेचा व्हिडिओही बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला होता. अमेरिकेने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

यापूर्वी देखील करण्यात आले आहेत हल्ले-

काही महिन्यांपूर्वी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासावर खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. यावेळी खलिस्तान समर्थक घोषणा देण्यात आल्या आणि आंदोलकांनी सुरक्षा अडथळे तोडून वाणिज्य दूतावासाच्या आवारात खलिस्तानी झेंडे लावले.(Latest Marathi News)

यापूर्वी लंडनमधील भारतीय दूतावासावरही खलिस्तान समर्थकांनी हल्ला केला होता. खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जरच्या कॅनडात हत्येनंतर भारतीय दूतावासाला लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

एनआयए अनेक प्रकरणांचा तपास करत आहे

अमेरिका आणि कॅनडातील भारतीय दूतावासांवर झालेल्या हल्ल्यांची राष्ट्रीय तपास यंत्रणा चौकशी करत आहे. मार्चमध्ये खलिस्तान समर्थकांनी दोन्ही देशांतील भारतीय दूतावासावर हल्ले केले होते. याशिवाय ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्तालयात हिंसक निदर्शने आणि तोडफोडीचे प्रयत्न करण्यात आले होते, त्याचीही चौकशी एनआयए करत आहे.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT