ग्लोबल

PM मोदींनी क्रिकेट विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना दिलं निमंत्रण; पार पडली द्विपक्षीय बैठक

, पंतप्रधान मोदींना अॅडमिरल्टी हाऊसमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

धनश्री ओतारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. यावेळी दोन्ही देशात द्विपक्षीय बैठक पार पडली. दरम्यान, क्रिकेट विश्वचषकासाठी पंतप्रधान मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज यांना भारतात येण्याचे निमंत्रण दिलं आहे. (PM Modi holds bilateral meeting with Australian counterpart Anthony Albanese in Sydney )

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात बुधवारी सिडनी येथे द्विपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींना अॅडमिरल्टी हाऊसमध्ये गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. (Latest Marathi News)

तसेच, यावेळी त्यांनी अॅडमिरल्टी हाऊसच्या व्हिजिटर्स बुकवर स्वाक्षरीही केली. पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे गव्हर्नर जनरल यासोबतच ऑस्ट्रेलियन विरोधी पक्षनेते यांच्यामध्येही बैठक पार पडली. द्विपक्षीय बैठकीनंतर, पीएम मोदींनी अल्बानीजबरोबरच्या संयुक्त पत्रकार परिषद घेतली. (Latest Marathi News)

खाण आणि खनिजांच्या क्षेत्रात आमचे धोरणात्मक सहकार्य मजबूत करण्यावर आम्ही रचनात्मक चर्चा केली. तसेच आम्ही ग्रीन हायड्रोजनवर टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार परिषदमध्ये मोदी काय म्हणाले?

क्रिकेटच्या भाषेत बोलायचे झाले तर आमचे आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध टी-२० मोडमध्ये आले आहेत. ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमध्ये संबंधाचा पुल आहे. आज पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशी झालेल्या चर्चेत आम्ही आमची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पुढील दशकात नवीन उंचीवर नेण्याविषयी चर्चा केली. नवीन क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्याच्या शक्यतांवर तपशीलवार चर्चा केली.(Latest Marathi News)

ऑस्ट्रेलियातील मंदिरांवर झालेले हल्ले आणि फुटीरतावादी घटकांच्या कारवायांबाबत आम्ही आधीही चर्चा केली होती आणि आजही त्यावर चर्चा केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंधांना त्यांच्या विचारांनी किंवा कृतीने दुखापत करणे कोणत्याही घटकाला मान्य नाही.(Latest Marathi News)

भारत ऑस्ट्रेलिया संबंधांचा दृष्टीकोन केवळ दोन देशांपुरता मर्यादित नाही. हे प्रादेशिक स्थिरता, शांतता आणि जागतिक कल्याणाशी देखील संबंधित आहे. क्वाड समिटमध्ये आम्ही पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्याशीही इंडो-पॅसिफिकवर चर्चा केली. ग्लोबल साउथच्या प्रगतीसाठी भारत ऑस्ट्रेलियाचे सहकार्य देखील फायदेशीर ठरू शकते.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT