PM Modi|Italy G-7 Esakal
ग्लोबल

PM Modi Italy: तिसरा कार्यकाळ सुरू होताच पीएम मोदी परदेश दौऱ्यावर, जाणून घ्या किती महत्त्वाचा आहे इटली दौरा

Giorgia Meloni G-7: 1997 आणि 2013 दरम्यान, G-7 चा G-8 मध्ये विस्तार झाला, ज्यामध्ये रशियाचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, 2014 मध्ये क्राइमियाचा ताबा घेतल्यानंतर रशियाला यातून निलंबित करण्यात आले.

आशुतोष मसगौंडे

G-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी इटलीला रवाना झाले. पंतप्रधान मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विदेश दौरा आहे.

इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध आणि गाझामधील संघर्षावर 13 ते 15 जून दरम्यान इटलीमध्ये होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत घमासान होण्याची शक्यता आहे.

G-7 म्हणजे काय?

G-7 चे पूर्ण नाव ग्रुप ऑफ सेव्हन आहे. जो एक अनौपचारिक जागतिक गट आहे. या गटात इटली, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, जपान, युनायटेड किंगडम आणि अमेरिकेचा समावेश आहे. युरोपियन युनियन देखील या गटात सहभागी आहे.

G-7 ची ​​स्थापना 1973 च्या ऊर्जा संकटानंतर आर्थिक सहकार्यासाठी करण्यात आली. पहिली G-7 शिखर परिषद 1975 मध्ये फ्रान्समध्ये झाली आणि त्यात फ्रान्स, अमेरिका, यूके, जर्मनी, जपान आणि इटली यांचा समावेश होता. त्यानंतर 1976 मध्ये, कॅनडाचा देखील यामध्ये समावेश झाला.

1997 आणि 2013 दरम्यान, G-7 चा G-8 मध्ये विस्तार झाला, ज्यामध्ये रशियाचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, 2014 मध्ये क्राइमियाचा ताबा घेतल्यानंतर रशियाला यातून निलंबित करण्यात आले.

दरवर्षी 1 जानेवारीपासून, एक सदस्य देश या गटाचे नेतृत्व करतो. इटलीने 1 जानेवारी 2024 रोजी जपानकडून अध्यक्षपद स्वीकारले. ते 31 डिसेंबर 2024 रोजी याचे अध्यक्षपद कॅनडाकडे सुपूर्द करतील.

या शिखर परिषदेला सात सदस्य देशांचे प्रमुख, युरोपियन युनियनचे प्रतिनिधी, आमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्था उपस्थित असतात.

G-7 2024 चे आयोजन आणि पाहुणे

13 जूनपासून इटलीमध्ये तीन दिवसीय G-7 शिखर परिषद सुरू होत आहे. 13 ते 15 जून या कालावधीत पुगलिया येथील बोर्गो एग्नाझिया येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यंदा इटलीच्या अध्यक्षतेखाली G-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे. तीन दिवसीय परिषदेत जागतिक नेते प्रमुख जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील.

या कार्यक्रमाला सात सदस्य देशांचे नेते तसेच युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष आणि युरोपियन युनियनचे प्रतिनिधित्व करणारे युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. .

याशिवाय, इटलीने आमंत्रित केलेले अनेक राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी होतील.

आमंत्रित केलेल्या जागतिक नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अल्जेरियाचे अध्यक्ष अब्देलमादजीद तेब्बौने, अर्जेंटिनाचे राष्ट्रपती जेवियर मेली, ब्राझीलचे अध्यक्ष लुला दा सिल्वा, पोप फ्रान्सिस, जॉर्डनचे राजा अब्दुल्ला II, केनियाचे अध्यक्ष विल्यम रुटो आणि तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांचा समावेश आहे.

असा असेल पंतप्रधानांचा इटली दौरा

13 ते 15 जून दरम्यान इटलीतील पुगलिया येथे G-7 शिखर परिषद होत आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी इटलीला गेले आहेत.

मोदी 14 जून रोजी आउटरीच सत्रात सहभागी होतील, जे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्यसागरावर लक्ष केंद्रित करेल.

25 एप्रिल रोजी लिबरेशन डेच्या 79 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून संभाषण केले होते. यादरम्यान मोदींनी मेलोनी यांचे G-7 शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल आभार मानले होते.

मोदींच्या इटली दौऱ्याचे महत्त्व

पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. मार्च 2023 मध्ये मेलोनी यांच्या भारत भेटीनंतर पंतप्रधान मोदींची ही दुसरी भेट असेल.

मोदी गुरुवारी उच्चस्तरीय शिष्टमंडळासह इटलीला गेले. या भेटीमुळे पंतप्रधान मोदींना भारत आणि ग्लोबल साउथच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या इतर जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल.

मिळालेल्या माहितीनुसार, या परिषदेमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि पंतप्रधान मोदी यांची भेट होऊ शकते.

G-7 शिखर परिषदेत भारतीय पंतप्रधानांच्या सहभागामुळे त्यांना गेल्या वर्षी भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेचा पाठपुरावा करण्याची संधी मिळेल. इटलीत होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

SCROLL FOR NEXT