PM Modi Global Leader eSakal
ग्लोबल

PM Modi : ग्लोबल लीडर मोदीच! लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थान कायम; मेलोनी कितव्या क्रमांकावर?

बायडेन, सुनक, ट्रुडो किंवा जिनपिंग यांपैकी कोणीही पहिल्या पाचमध्ये नाही.

Sudesh

Global Leader Approval Rating : मॉर्निंग कन्सल्ट संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल यादीमध्ये पंतप्रधान मोदींचं नाव पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर आलं आहे. जगभरातील 22 प्रसिद्ध नेत्यांमध्ये PM मोदींना सर्वाधिक 76% मतं मिळाली आहेत.

या यादीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचंही नाव आहे. अर्थात, यांपैकी कोणीही टॉप पाच नेत्यांच्या यादीतही आले नाही.

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेज मॅन्युएल लोपेज ओब्राडोर (66% रेटिंग) आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लँडचे राष्ट्रपती अ‍ॅलन बर्सेट (58% रेटिंग) आहेत. ब्राझीलचे राष्ट्रपती लूला डी सिल्वा हे 49% रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर, तर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज हे 47% रेटिंगसह पाचव्या क्रमांकावर आहेत.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी 41% रेटिंगसह सहाव्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे आठव्या क्रमांकावर आहेत. जस्टिन ट्रुडो हे तेराव्या, तर ऋषी सुनक 17 व्या क्रमांकावर आहेत. आयर्लँडचे पंतप्रधान लिओ वऱ्हाडकर हे 36% रेटिंगसह दहाव्या क्रमांकावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: अजितदादांच्या खांद्यावर नरेश अरोरांचा हात... मिटकरींचा पक्षाला घरचा आहेर, राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढली?

Latest Marathi News Updates : इव्हीएमविरोधात लढाईसाठी विरोधकांची रणनीती

Nashik News : नवीन डांबरीकरण झालेले रस्ते खोदाईस मनाई; जुन्या खोदलेल्या रस्त्यांचा मागविला अहवाल

Hasan Mushrif : कागलमधून हसन मुश्रीफ विजयी झाले, पण..; काय सांगते मतदारसंघातील आकडेवारी, घाटगे पोहोचले जवळपास

Rajkumar Rao Fees: स्त्री २'च्या यशानंतर राजकुमार रावने वाढवली फी? ५ कोटींच्या चर्चेवर दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT