PM Modi UAE Tour esakal
ग्लोबल

PM Modi UAE Tour : UAE मध्ये पंतप्रधान मोदी अन् अध्यक्ष शेख मोहम्मद झायेद यांच्या हस्ते UPI आणि RuPay कार्ड सेवेचा शुभारंभ

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१३) अबुधाबीमध्ये युपीआय आणि RuPay कार्ड सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

संतोष कानडे

नवी दिल्लीः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१३) अबुधाबीमध्ये युपीआय आणि RuPay कार्ड सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

RuPay ही बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा आणि ऑनलाईन पेमेंट प्रणाली आहे. युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात युपीयआय ही एक भारतीय तात्काळ पेमेंट सिस्टीम आहे. UAE मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्या हस्ते ऑनलाईन पेमेंट सेवेचा शुभारंभ झाला.

दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीमधील हिंदू समुदायाच्या पहिल्या मंदिराचे उद्या (ता. १४) उद्‌घाटन होणार असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. गंगा-यमुनेच्या पाण्यासह भारतातील विविध भागांमधील लाकूड, दगड आणि इतर गोष्टींचा वापर मंदिर निर्माण करण्यासाठी झाला आहे. स्वामिनारायण संस्थेने उभारलेले हे मंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असल्याचे संस्थेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार आहे.

अबूधाबीमध्ये UPI आणि RuPay कार्ड सेवा सुरू करण्यापूर्वी, PM मोदी आणि अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांनी द्विपक्षीय बैठक घेतली. दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत अनेक सामंजस्य करार पार पडले. यावेळी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा हे द्विपक्षीय चर्चेत सहभागी झाले होते.

दुसरीकडे, पंतप्रधान मोदी मंगळवारी अबुधाबी येथील झायेद स्पोर्ट्स सिटी स्टेडियमवर भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करणार आहेत. तर उद्या अबुधाबीमध्ये BAPS हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT