ग्लोबल

US: अमेरिकेच्या संसदेत PM मोदींची दहशत? 600 दिवस व्हिसाची प्रतिक्षा करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा

600 दिवस व्हिासाची प्रतिक्षा करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा

धनश्री ओतारी

अमेरिकेच्या संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दहशत पाहायला मिळाली. 600 दिवस व्हिासाची प्रतिक्षा करणाऱ्या भारतीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. ( Pm Modi Usa Visit America Senator Raise Concern Over Visa Wait Time For Indian )

भारतीयांना अमेरिकेच्या व्हिसासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. आता हा मुद्दा अमेरिकन संसदेत पोहोचला आहे. भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा मिळण्यास किती वेळ लागतो यावर अमेरिकन खासदारांनी प्रश्न उपस्थित केला असून भारत हा सर्वात महत्त्वाचा मित्र देश आहे, त्यामुळे ही समस्या लवकरात लवकर सोडवायला हवी अशी चर्चा अमेरिका संसदेत सुरुय.

यूएस सिनेट फॉरेन रिलेशन्स कमिटीचे अध्यक्ष सिनेटर बॉब मेनेंडेझ आणि इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष मायकेल वॉल्ट्ज यांनी भारतीयांना यूएस व्हिसा मिळण्यात होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

'अमेरिकन लोकांचे भारतीयांशी चांगले संबंध आहेत. भारत आता क्वाडचा एक भाग आहे आणि आम्ही भारतासोबतचे आमचे संबंध सतत मजबूत करत आहोत. असे असूनही भारतात अमेरिकेच्या व्हिसासाठी लागणारा वेळ सर्वाधिक आहे. जगभरात यूएस व्हिसासाठी लागणाऱ्या सरासरी वेळेपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. अशी खंत मेनेंडेझ यांनी यावेळी व्यक्त केली.

B1-B2 व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना 450-600 दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याची माहितीदेखील मेनेंडझ यांनी यावेळी दिली.

अमेरिकेचे सिनेटर मायकेल वॉल्ट्ज म्हणाले की, 21 व्या शतकात अमेरिकेचे भारतासोबतचे आर्थिक, राजनैतिक आणि संरक्षण संबंध सर्वात महत्त्वाचे आहेत. असे असतानाही भारतीयांना व्हिसासाठी एवढी प्रतीक्षा करावी लागणे वेदनादायी आहे. ते म्हणाले की, मुंबईतील सरासरी प्रतीक्षा कालावधी 587 दिवस आहे तर दोन्ही देशांमधील व्यापार $150 अब्जांपेक्षा जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT