pm narendra modi esakal
ग्लोबल

PM Modi : पंतप्रधान मोदींबद्दल वादग्रस्त टिपण्णी केल्यानंतर मरियम शिऊना निलंबित; तीन मंत्र्यांवर कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्षद्वीप दौरा सध्या चर्चेत आहे. मोदींच्या फोटोंवरुन मालदीवच्या मंत्री मरियन शिऊना यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लक्षद्वीप दौरा सध्या चर्चेत आहे. मोदींच्या फोटोंवरुन मालदीवच्या मंत्री मरियन शिऊना यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भारतातून नाराजी व्यक्त होत होती. मालदीव सरकारनेही या वक्तव्याचा निषेध केला होता.

आता मालदीव सरकारने मंत्री मरियम शिऊना, मालशा आणि हसन जिहान यांना निलंबित केलं आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहीम मोहम्मद सोलिह यांनीदेखील याप्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सोशल मीडियावर मालदीव सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या विधानाचा मी निषेध करतो.

केलेल्या कारवाईबद्दल बोलताना मालदीव सरकारचे प्रवक्ते मंत्री इब्राहिम खलील यांनी सांगितलं की, वादग्रस्त टिपण्णी केल्यामुळे दोन मंत्री आणि एका खासदाराला निलंबित करण्यात आलेलं आहे.

मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिऊना यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर भारताने मुइझु सरकारकडे मुद्दा लावून धरला होता. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्ताने मंत्र्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर मालदीव सरकार नरमलं होतं.

मालदीव सरकारने म्हटलं की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग लोकशाही पद्धतीने आणि जबाबदारीने केलं पाहिजे. द्वेष पसरवणारे, नकारात्मक वक्तव्य करण्यात येऊ नयेत. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सहयोगी देशांशी संबंध बिघडू नयेत अशी काळजी घ्यावी.

‘‘परदेशातील नेत्यांबद्दल आमच्या सरकारमधील मंत्र्यांनी समाजमाध्यमांनी केलेली वक्तव्ये ही आमच्या सरकारची अधिकृत वक्तव्ये नाहीत,’’ असे मालदीवच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. ‘‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला लोकशाही मूल्यांचे भान हवे असे आमचे मत आहे, द्वेष आणि नकारात्मकता पसरविणारी आणि मालदीवच्या सहकारी देशांशी संबंध बिघडविणारी वक्तव्ये आम्हाला मान्य नाहीत’’ असे या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान याप्रकरणी मालदीव सरकारने मलाशा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महझूम माजिद या तिघा मंत्र्यांना रविवारी निलंबित केले.

मालदीवमध्ये प्रोग्रेसिव्ह पार्टी ऑफ मालदीव (पीपीएम) नुकतीच सत्तेवर आली आहे. माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव करून डॉ.मोहम्मद मुइज्जू अध्यक्ष बनले आहेत. इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यावर भर दिला होता. याउलट मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी मालदीवचे भारताशी संबंध बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी केल्या आहेत. मुइज्जूने भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogendra Yadav: हरियानाच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात काय होणार? योगेंद्र यादव यांनी केलं भाकीत

Farmers Protest: दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन; उपोषणाची घोषणा! दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर्स होणार रवाना

पाकिस्तान क्रिकेटची 'सर्कस'! Champions Trophy 2025 साठी निवडला नवा प्रभारी कोच; जेसन गिलेस्पी आता फक्त...

Winter Kitchen Cleaning Tips: किचन हे आरोग्याचे अन् रोगाचे माहेरघर! हिवाळ्यात अशा प्रकारे स्वयंपाकघराची ठेवा स्वच्छता

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT